गोदावरी फाऊंडेशनच्या संस्थांमध्ये योग दिनानिमीत्त प्राणायाम

0
जळगाव – येथील गोदावरी फाऊंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राणायाम शिबीराद्वारे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक योग दिनानिमीत्त गोदावरी फाऊंडेशनच्या जळगाव सीबीएसई स्कुल, वैद्यकीय महाविद्यालय, भुसावळ आणि सावदा सीबीएसई स्कुल, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी योग-शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापकांनीही योगासने केली. गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही.जी.अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक, गोदावरी आयएमआरचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस. आर्विकर, रजीष्ट्रार प्रमोद भिरूड, कृषी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, डॉ. एस.एम.पाटील, सीबीएसई स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी, भुसावळ येथील अनघा पाटील, यांनीही योग शिबीरांमध्ये सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*