भूजल कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर

0
भुसावळ | प्रतिनिधी :  महाराष्ट्र भुजल विकास व व्यवस्थापन अधिनियम २००९ च्या कायद्याची अंमलबजावणी करतांना ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग नोंदवून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतच्या सक्त सुचना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी येथे दिल्या.

भुसावळ येथील आयएमए हॉलमध्ये भुसावळ उपविभागीयस्तरीय अधिकारी व पदाधिकारी यांच्या क्षमता बांधणीसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी यांनी विविध सुचना दिल्या.

महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम २००९ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवार दि.२० रोजी भुसावळसह बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील अधिकारी व पदाधिकार्‍यांची कार्यशाळा पार पडली.

वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि विकास यंत्रणा विभागातील डॉ.अनुपमा पाटील यांनी कायद्याची सविस्तर माहिती पीपीटी द्वारे सादर केली. तालुका व गाव समितीची रचना, पाणलोट समिती, टंचाई घोषित झाल्यानंतर करावयाची काटेकोर अंमलबजावणी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षीत करणे, जल व्यवस्थापन आराखडा व २००९ च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या विविध बाबींवर डॉ.पाटील यांनी सखोल माहिती दिली.

सहाय्यक भुवैज्ञानिक व्ही.एस.जवंजाळ यांनी चित्रङ्गित दाखवून भविष्यातील पाणीटंचाई आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावरील माहिती दिली.

रमेश शंकपाळ यांनी देखील पीपीटी द्वारे सादरीकरण करून भुजल विकासाविषयी सांगितले. नाशिक विभागाचे उपसंचालक अनिल वाघमारे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे चित्रङ्गित दाखवून जनजागृतीवर भर दिला.

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी कार्यशाळेत सादर करण्यात आलेल्या पीपीटी सादरीकरणाचे कौतुक करून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. कायद्यातील तरतुदींनुसार अधिकारी व पदाधिकारी यांनी आपापल्या भुमिका लक्षात घेवून अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले.

सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक भुवैज्ञानिक व्ही.एस. जवंजाळ यांनी केले.

कार्यशाळेला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, वरिष्ठ भुवैज्ञानिक डॉ.अनुपमा पाटील, नाशिक विभाग उपसंचालक अनिल वाघमारे, सहाय्यक भुवैज्ञानिक व्ही.एस.जवंजाळ, रमेश शंकपाळ, प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, भुसावळ तहसीलदार मिनाक्षी राठोड, मुक्ताईनगर तहसीलदार रूपाली पवार, बोदवड तहसीलदार, भुसावळ पं.स.सभापती सुनिल महाजन, बोदवड पं.स.सभापती गणेश पाटील, मुक्ताईनगर पं.स. सभापती सां.बा. पाटील, तालुक्याचे गटविकास अधिकारी, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*