पुरुषोत्तम मास (मलमास)

0
प्राचीन भारतीय कालगणना ही जगात सर्वात प्रगत अर्वाचिन काळातसुद्धा वाखाणली गेली आहे. चंद्र-सूर्य नित्य अवकाशातले भ्रमण करणारे ग्रह. यांचे प्रत्यक्ष अवकाशातील स्थान, वेळ याचे अचूक निदान करणारे भारतीय पंचांग हे कालनिर्णय देणारे साधन गणित मान्य आहे.

त्यांच्याआधारेच आपण सध्या अधिक ज्येष्ठ मास साजरा करत आहोत. या मासात उपासना प्रामुख्याने जगत्पालक, जगत्चालक, ऐश्वर्यसंपन्न महाविष्णूंची केली जाते. त्यासाठी नित्य मानसपूजा, देवपूजा करताना मुखाने हरिनाम कीर्तन व 108 नावांनी नित्य ‘रंगनाथ’ मूर्तीस तुलसी अर्पण करून विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता रोज 1 अध्याय पठण किंवा मराठीतील अनुवादित अर्थ वान करावे. अत्रिक महात्म्य ग्रंथ एक अध्याय वाचन.

भागवत ग्रंथाचे एक महिना पूर्ण वाचन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. हे करताना श्री परमेश्वरप्रित्यर्थ यथाशक्ती पूजन, अर्चन, जप, अनुष्ठान करिष्ये असा पूजनापूर्वी उजव्या हातात पाणी घेऊन पाणी सोडत संकल्प करावा. श्रेयस गोष्टीची इच्छित प्राप्ती प्रारब्धानुसार होत राहील, परंतु आपण कधी हे सर्व मनोवांछित कामना फलद्रुप करणार्‍या ईश्वरी शक्तीस तुझीच पाणी सोडत गाडी, बंगला, पत्नी इ. सेवा करून मला स्वानंदाची अनुभूती दे, असा ‘प्रेयस’ संकल्प करीत नाही. हा महिना त्यासाठीच आहे.

या मासात शक्यतो अपेयपान अभक्ष भक्षण, उडीद, कांदा, लसूण, गाजर, मुळा, कोबी, तीळ तेल, खाडव असे तामस भाव जागृत करून उपासनेची प्राप्त झालेली सात्विक प्रवृत्ती तेज कमी करू नये. शक्य झाल्यास नित्य अथवा पर्वकाळी पौर्णिमा 29 मे दशहरा गंगावतरण दिन 24 मे रोजी एकादशी दिनी 25 मे व 10 जून, 13 जून अधिक मास समाप्तीदिन, 26 मे शनिप्रदोष द्विपुष्कर योगदिनी 8 जून सर्वार्था अमृत सिद्धीयोग असे कमीत कमी तीनवेळा गोदावरी रामकुंड तीर्थी स्नान करून कपालेश्वर, मुरलीधर, काळाराम मंदिर 33 वस्तूंसह दीपदान करावे.

या कृत्यात नातू-नात, मुले, सुना, पती, पत्नी आदींचा सहभाग असावा. नित्य घरातील गोपाळकृष्णास एक महिना नंदादीप (समई ज्योत) प्रदिप्त ठेवावा. या महिनाभरात तांबूल देण्याने आपण ऐश्वर्यवान बनू. रोज जेवणानंतर आपल्या घरच्या सदस्यांव्यतिरिक्त बाहेरच्या गोत्र आप्त मित्र, शेजारी बालगोपाळ, सखी, कुमारी अशा एकास रोज मसाला पान विडा द्यावा. देवास रोज नैवेद्य दाखवून त्यात दूधसाखर, गूळ, तूप खडा, केळ शिकरण, खीर असा एखादा गोड पदार्थ असावा. प्रात:काळी सायंकाळी छोटी दूध वाटी भरून दूधसारखर वा दहिसाखरेचा कृष्णास नैवेद्य दाखवावा.

आपणा सर्वांसाठी नित्य म्हणण्यास एक छोटी श्रीकृष्ण आरती देत आहे. तिची एक स्वयंम् हस्ताक्षर, जावा, संगणक प्रत काढून त्याच्या प्रती सर्व परिवार सदस्यांना सत्यम् सामूहिक आरती म्हणताना द्याव्यात. त्यानंतर सर्वांनी मंत्रपुष्प झाल्यावर नित्य 11 वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:’ जप सुमधूर स्वरात सामूहिकपणे करावा. पंडित जसराज यांचे हे भजन, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी (यू-ट्यूबवर ऐकावे)

हे नाथ नारायण वासुदेव
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ
मुकुंद विष्णुं भगवन नमस्ते॥
या नंतर 108 वेळा माळ
ॐ क्लीं कृष्णाय नम: हा जप करून
श्रीकृष्णांची खालील मंगल आरतीचे गणेश देवीसोबत गायन करून देवास पंचारती करावी.
‘गोपाल कृष्ण राधा कृष्ण जय राधे जय गोपाळ’ हा 18 सिद्ध मंत्र बीजाचे गायन करीत स्त्री-पुरुष बाल युवतींनी फेर धरत गावा. फुगड्या खेळाव्यात.
श्रीकृष्ण आरती
अवतार गोकुळी हो, जन तारावयासी
लावण्य रुपडे हो, तेज पुंजाळ राशी
उगवतां कोटिबिंबे – रवी लोपले राशी।
उत्साह सुखरां, महाथोर मानसी ॥1॥
जय देवा कृष्णनाथा, जय रखुमाईकांता ॥धृ॥
आरती ओवाळीन तुम्हा देवकीसुता ॥ ध्रुवपद॥
कौतुक पाहावया नाव ब्रह्मयाने केली।
वत्सेंहि चोरुनीयां सत्यलोकासी नेली
गोपाल गायी वत्सें दोन्ही ठायी रक्षिली।
सुखाचा प्रेमसिंधू अनाथांची माऊली ॥2॥
राखिता गोधने हो इंद्र कोपला भारी
मेध जो कडाडीला शिळा वर्षंता धारी
राखिले गोकुळ हो नरवी धरिला गिरी
निर्भय लोकपाळ. अवतरले हरी ॥3॥
वसुदेव देवकीची बंद फोडिली शाळा
होऊनी विश्वजनिता तया पोटिंचा बाळ
दैत्य हे त्रासियेले. समुळ कंसासी काळ
राजया उग्रसेना केला मथुरा पाळ ॥4॥
तारिले भक्तजनां दैत्य निर्दाळुनी
पांडवा सहाय्यकारी अडलिया निर्वाणी
गुण मी काय वर्णू. मति येवढी वाणी
विनवी दास तुका ढाव देई
तव चरणी ॥5॥
अधिक मास महात्म्य
लेखांक : 2
रवींद्र प्रभाकर देव
9403512988

LEAVE A REPLY

*