एकच भाषा बोलणार्‍यांची निर्णयक्षमता चांगली

0
लंडन | वृत्तसंस्था :  बहुभाषाकोविद असणे हे विद्वतेचे एक लक्षण मानले जाते. मात्र, एका संशोधनात आढळले की, एकाच भाषा बोूलणार्‍यांची निर्णयक्षमता दोन किंवा अनेक भाषा बोलणार्‍यांपेक्षा अधिक चांगली असते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अंतज्ञानही अधिक असते. असा निष्कर्ष केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काढला आहे.

मानसिक चाचण्यांमध्ये द्विभाषिक लोक एक भाषा बोलणार्‍यांवर नेहमीच मात करीत असल्याने संशोधकही या निष्कर्षामुळे आश्‍चर्यचकित झाले आहेत. संशोधकांनी दोन किंवा एक भाषा बोलणार्‍या प्रत्येकी ३१ जणांची संगणकीय चाचणी घेतली. त्यांना संगणकाच्या दोन पडद्यावर दोन वर्तुळे दाखविण्यात आली.

प्रत्येक वर्तुळात काही बिंदू होते. सहभागींना कुठल्या वर्तुळात अधिक बिंदू आहेत, असे ओळखण्यास सांगितले. यावेळी एक भाषा बोलणार्‍यांनी दुसर्‍या गटापेक्षा १० टक्के अधिक अचूक उत्तरे दिली.

संशोधक डॉ. रॉर्बोटो ङ्गिलिपी म्हणाले, दोन भाषा बोलण्याचे ङ्गायदे असून, त्यामुळे निर्णयक्षमता विकसित होत असल्याचा समज आहे.

आपल्या संशोधनाचे निष्कर्ष मात्र या पूर्वीच्या संशोधनापेक्षा वेगळे आहेत. आम्ही याबाबत अधिक सखोल संशोधन करत आहोत.

LEAVE A REPLY

*