फुजीफिल्मचा इन्स्टॅक्स इन्स्टंट मिनी कॅमेरा

0
क्लोज-अप लेन्स असलेला कॅमेरा फुजीफिल्म कंपनीने बाजारात दाखल करण्याची घोषणा केली आहे.

इन्स्टॅक्स इन्स्टंट मिनी ९ हे मॉडेल ग्राहकांना फ्लेमींगो पिंक, लाईम ग्रीन, कोबाल्ट ब्ल्यू, स्मोकी व्हाईट आणि आईस ब्ल्यू या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. फुजीफिल्मने आधी इन्स्टॅक्स या मालिकेत मिनी २५, मिनी ७० व मिनी ९० हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहेत.

यात आता इन्स्टॅक्स इन्स्टंट मिनी ९ या मॉडेलची भर पडली आहे. या कॅमेरामध्ये एक सेल्फी मिरर देण्यात आला असूू उत्तम दर्जाची सेल्फी प्रतिमा घेण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

तसेचक्लोज-अप लेन्स असल्याने अवघे ३०७ ग्रॅम वजन या कॅमेर्‍याचे असेल. ६२ बाय ४६ मिलीमीटर इतक्या आकाराच्या प्रतिमा कॅमेरा घेवु शकतो. दोन बॅटर्‍या यामध्ये असल्याने सुमारे १०० च्यावर तो फोटो घेवु शकतो.

LEAVE A REPLY

*