दहावी हेच अंतिम ध्येय नव्हे!

0

परवाच १० वी चा निकाल लागला आणि त्यानंतर आलेल्या सोशल मिडियावरच्या बातम्यांनी अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या़़़ त्यांनाच शद्वरुप देण्याचा हा प्रयत्ऩ़़

आनंद, आश्चर्य, कौतुक, अभिमान अशा सर्व भावना मनात दाटल्या, ते राज्यामध्ये १९३ मुलांनी १०० टक्के गुण मिळवल्याचे समजल्यावर! पण त्याचबरोबर कमी गुण मिळालेल्या मुलांची त्यांच्या घरच्यांकडूनच होणारी अवहेलना बघून प्रचंड मानसिक ताणामुळे निकालाआधीच आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार्‍या त्या कोवळ्या मुलांकडे बघून उद्वेग, विषाद, चिंता अशा संमिश्र भावनांनी मनाचा ताबा घेतला़ काहीतरी चुकतयं निश्चितच़़़

जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी त्या नुकत्याच वयात येणार्‍या जीवांची ओढाताण बघवत नाही़ कुठे घेऊन जात आहोत आपण या पीढीला, या जीवांचे आपण पालक आहोत की मालक, हेच विसरतो आहोत़ मुलांना काय करावसं वाटतं़़़ त्यांना काय आवडतं हे कधीतरी विचारल की नाही? माझा मुलगा इंजिनिअर बनणारं, माझी मुलगी डॉक्टर बनणाऱ़़ अरे या पलिकडे जग आहे की नाही?

१०वी चा निकाल हा आयुष्याचा निकाल असल्यासारखा त्याचा बागुलबुवा मुलांच्या मानगुटीवर बसवला जातो़ नापास किंवा जेमतेम काठावर पास झालेल्यांना आसपासची ही तडाखेबंद टक्क्यांची ङ्गलंदाजी बघून किती मानसिक त्रास होत असेल त्याची नुसती कल्पनाच करुन अंगावर काटा येतो़़़

त्यांना नुसतं इन्स्पायर करुन हा विषय संपत नाही़ पांढर्‍या कागदावर काळं लिहून तीन तासात बुद्धीमत्ता ठरवणार्‍या या सिस्टीमध्ये या गरीब जीवांची काहीतरी व्यवस्था करायलाच हवी! एवढेच नाही मी तर म्हणते एखादा मुलगा किंवा मुलगी शाळेतील अभ्यासाच्या विषयात खरोखर मठ्ठ असेल आणि मिळाले कमी गुण तर काय ङ्गरक पडतो़़़

कुठल्या ना कुठल्या गोष्टीत प्रत्येक व्यक्ती मास्टर असतेच़़़! पण ह्या दहावीच्या निकालामुळे त्याचा आत्मविश्वासच संपला तर खेळ खतम्! वाईट वाटते खरंच! ८० टक्केपेक्षा कमी गुण असलेल्या मुलांच्या घरांमधलं वातावरण कमालीचं तापलं आहे़

आपण त्यांच्यासाठी भरलेल्या १०वीच्या महागड्या क्लासेसच्या ङ्गी चे वैङ्गल्य पालकांच्या डोळ्यामध्ये दिसतंय आमच्याच इमारतीत राहणार्‍या एका विद्याथ्र्याने ६७ टक्के गुण मिळवल्याने त्यांच्या घरावर तर शोककळाच पसरली आहे़ निदान जेवढे हजार भरले तेवढे टक्के तरी मिळवले असते म्हणून त्याचे आई-बाबा त्याला घालून पाडून बोलता आहेत़ खूप वाईट वाटतं हो हे सगळं बघूऩ याच वातावरणापेक्षा मुलांना मृत्यू बरा वाटायला लागला आहे! आतातरी जागे व्हा, जागरुक व्हा!

मुलांना अभ्यासाला स्वतंत्र खोली, ए़सी़, टेबल-खुर्ची, स्वतंत्र बेड, लॅपटॉप, लाखो रुपये क्लासेसची ङ्गी, वाट्टेल तशा वह्या, पुस्तकं, महागडे पेन्स इतकं सगळं पुरवून देखील मुलाने चांगले गुण मिळवले नाहीत तर याचा पालकांना येणारा ताण़़़ या सगळ्या गोष्टी मुलांना नकोच आहे़़़

त्यांना आपल्याकडून हवा आहे विश्वास, प्रेम़़़ आता यावर पालक म्हणतील की हा सगळा खर्च आम्ही त्यांच्यावरील प्रेमामुळेच तर केला़ पण मित्रांनो, प्रेम करायला कमविलेला पैसा खर्च करावा लागत नाही, खर्च करावा लागतो तो ’वेळ’़ आपण मुलांबरोबर किती वेळ घालवला या १०वी च्या वर्षी किती वेळा त्यांचा अभ्यास, त्यांचे टाईम शेड्युल्ड समजून घेतले़़़़

त्यांना काय वाटतं़़ ते काय बोलतात, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या भावविश्वसात सध्या काय बदल होताहेत, वर्तमान काळातल्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, राजनैतिक घडामोडींबद्दल त्यांची काय मत आहेत़़़ ती योग्य आहेत किंवा नाही़ त्यांना काय काय माहित आहे, कायम माहित नाही, हे कधी मजवून घेतलय का? ङ्गक्त ’’आम्ही खर्च केला आहे तू अभ्यास करुन आम्हाला रिटर्न दे’’ एवढाच व्यवहार आपण पालक म्हणून मुलांबरोबर उरलो आहोत़

एक लक्षात ठेवायला हव, पालक हाणं म्हणजे भरपूर पैसा कमवून त्यांना वाट्टेल त्या सुख-सुविधा पुरवून त्यांच्याकडूून गुणांची अपेक्षा करणं नाही तर पालक असणं ही ङ्गार मोठी जबाबदारी आहे़ जीवनात तू कितीही वेळा अयशस्वी झाला तरी आमचं तुझ्यावर तितकचं प्रेम राहील हा विश्वास जरी मुलांच्या मनांत निर्माण करता आला तरी खुप झालं़

कितीही संकटं आली तरी खचून जाऊ नकोस, तुझे आई-बाबा कायम तुझ्या पाठीशी असतील, तुला योग्य वाटेल ते शीक, स्वत:च्या पायावर उभा रहा, चांगला नागरीक बन, उत्तम माणूस बन, आम्ही तुझ्याबरोबर कायम आहोत, हे छातीठोकपणे सांगता येण हे यशस्वी पालकाचं लक्षण आहे़

आपण पालकच कमकुवत मनाचे आहोत़ आपल्यालाही गुणांच्या पलीकडे जावून जगाचा विचार करता येत नाहीए़़़ आपण काय मुलांना सांगणाऱ

पेपरमध्ये एक बातमी आली त्यात तर १२ वी मध्ये मुलाला कमी मार्क्स मिळाल्याने वडिलांनी आत्महत्या केली़ अरे काय हे! त्या मुलाने पुढचं आयुष्य हे ओझं मनावर घेऊन जगायचं?

जोपर्यंत पालक आणि मुलांमधल नातं व्यवहाराचं आहे तोपर्यंत असंच सुरु राहणाऱ़़ ते नातं प्रेमाने कसं बांधायच यासाठी भविष्यकाळात कोर्सेस उपलब्ध करुन द्यावे लागतील; इतकी वेळ येण्याआधीच जागरुक व्हा!

आपल्या मुलांचे मित्र व्हा! त्यांना देशप्रेम, धर्मप्रेम शिकवा़़़ प्रेमाची बीजं रोवलीत तरच प्रेम उगवेल़़़ नाहीतर आपल्या म्हातारपणी आपल्यालाच या गोष्टीचा अनुभव येईल की आपण मुलांना ङ्गक्त कोरडा व्यवहार शिकविला त्यांच्यामध्ये प्रेमाचे पाणी शिंपडून ओलावा निर्माण करायचा राहूनच गेला़़़!!!

शरु भालेराव
मो़ ८६५२३२६३६३

LEAVE A REPLY

*