चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगामाची ७० टक्के पीकपेरणी पूर्ण !

0

चाळीसगाव, | प्रतिनिधी :  पाऊस वेळेवर पडल्याने यंदा तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी, मका, उडीद, मुग बरोबरच ज्वारी, बाजरी आदि पिकाची लागवड शेतकर्‍यांनी केली असून जवळपास ७० टक्के पिक पेरणी पूर्ण झाली आहे.

परंतू पेरणी नतंर पावसाने हुलकावणी दिल्यानेे शेतकरी चिंंताग्रस्त असून पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

चाळीसगाव तालुक्यात ७० ते ७५ टक्के लोक शेती करतात. त्यामुळे मान्सुन सुरु होण्याआधीच शेतकर्‍यांची पुढील पेरणीसाठी लगबग सुरु होते. यंदा चाळीसगाव तालुक्यात पाऊस वेळेवर म्हणजेच जून महिन्याच्या सुरुवातीला पडला. सुरुवातीला दोन पाऊस जोरदार पडले. पाऊस चांगला पडल्याने शेतकर्‍यांनी त्वरित खरीप हंगामातील पेरणी करण्यास सुरुवात केली.

कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, उडीद, मुंग, भुईमुंग आदि पिंकाची शेतकर्‍यांनी पेरणी केली. तालुक्यातील ६१ हजार हेक्टर जमीन क्षेत्रात आतापर्यंत पेरणी झाली आहे. यात सर्वांत जास्त ४० हजार ५० हेक्टर जमीन क्षेत्रात कपासाची पेरणी झाली असून उर्वरीत क्षेत्रात मका,ज्वारी, बाजरी, भुईमूंग, उडीत, मुंग आदि पिकाची पेरणी करण्यात आली आहे.

सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे जवळपास तालुक्यात आतापर्यंत ७० टक्के शेतकर्‍यांनी पेरण्या उरकऊन घेतला आहे. तर काही शेतकरी पेरणी करत आहे. पेरणी नतंर मात्र गेल्या १० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

दुबार पेरणीची वेळे येत की काय आहे, या चिंतेत ते सद्या आहे. तर खडकी सिम परिसरातील धामणगांव, पळासरे, तिरपोळे, चिंचगव्हाण, दहिवद आदि भागात फक्त ४० ते ५० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. कारण त्याभागात सुरुवातीलाच कमी पाऊस पडला होतो. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे टाळले आहे.

कपाशी व मका लागवडी भर.. तालुक्यात यंदा पावसाची सुरुवात चांगली झाल्याने आतापर्यंत जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

शेतकर्‍यांनी यंदा कपाशी व मका लागवडीवर जास्त भर दिलेला आहे. तसेच काही भागात ज्वारी, बाजरी, भुईमूग, उडीतची लागवड करण्यात आली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत असून पाऊस पडल्यावर बाकी शेतकरी पेरणी करणार करतील.असे कृषी आधिकारी श्री राजपुत यांनी सांगितले.

पावसाच्या आशेवर पेरणी

आमच्या भागात पाऊस फार कमी पडलेला आहे, तरी देखील आम्ही पाऊस पडले ह्या आशेने पेरणी केली आहे. दरवर्षा प्रमाणे यंदाही आम्ही पावसांची प्रतिक्षा करतो आहे.असे शेतकरी भिमराव मोरे, (करगांव) यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*