लॉंग जॅकेटची नवी स्टाईल

0
पुरुषांच्या फॅशनमध्ये सध्या पारंपारिक आणि पाश्‍चात्य अशा दोन्ही प्रकारच्या पेहरावांवर लॉंग जॅकेटची नवी स्टाइल सध्या जळगावमध्ये दिसत आहे.

या स्टायलिंगवर सिनेअभिनेत्यांचा प्रभाव दिसुन येत आहे. यामध्ये पार्टी वेअर जॅकेटला अधिक पसंती दिली जात आहे.

लॉंग जॅकेट, लॉंग जॅकेट विथ प्लेन कॉलर, लॉंग जॅकेट विथ स्टँड कॉलर, डेनिम लॉंग जॅकेट, प्लेन कॉटन नी लेंग्थ जॅकेट असे जॅकेटचे भन्नाट प्रकार सध्या बाजारात दिसत आहेत. स्टाइल स्टेंटमेंट, दुचाकीवर लॉंग ड्राइव्हसाठी ही जर्कीन फारच आरामदायी ठरतात.

त्यामुळे ऊन, वारा आणी पाऊस यापासुन संरक्षण करण्यासह स्टायलिंग सांभाळता येत असल्याने लॉंग जॅकेटकडे कल वाढत आहे. एखाद्या पार्टीसाठी किंवा समारंभासाठी कॉटन लॉंग जॅकेट हा प्रकार वापरला जाताना दिसत आहे. जॅकेटमध्ये सगळ्या प्रकारच्या रंगसंगती आहेत.

त्यातही ब्लॅक, ग्रे आणि ऑफ व्हाइट कलर या रंगांना सर्वाधिक मागणी आहे. त्यात गडद रंगाच्या जॅकेटला वेगळ्या रंगाची कोट कॉलर आणि स्टँड कॉलर हे पर्याय देण्यात आले आहेत. मिलिटरी जॅकेट सर्वाधिक भाव खाणारं ठरतंय. याप्रकारचं जॅकेट कुठल्याही रंगाची पँट आणि आतल्या शर्ट वा टीशर्टवर शोभून दिसत असल्यानं ते सर्वाधिक खरेदी केलं जातंय.

त्यात तीन ते चार प्रकारच्या रंगसंगती उपलब्ध आहेत. लॉंग जॅकेट पार्टी वेअर प्रकारातही उपलब्ध आहेत. याला बाहेरच्या दोन्ही बाजूंना स्टायलिश असे कट्स देण्यात आले आहेत.

त्यामुळे याला एखादा कोट किंवा ब्लेझरसारखा लूकही आहे. वेगवेगळ्या प्रकारची मोठी बटणं आणि लेस तसेच पेस्टल कलरचे टी-शर्ट आणि शर्टवर गडद रंगांचे जॅकेट वापरले जातात. या जॅकेटमध्ये लॉंग आणि शॉर्ट असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

*