‘ती’ च्यामुळेच भारताचा पराभव

0
लंडन |  वृत्तसंस्था : विराट कोहलीची टीम इंडियाच जिंकणार हे अवघे जग ओरडून सांगत असताना पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केला.

आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणार्‍या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले. त्यानंतर या पराभवाची कारणे काय आहेत हे अनेकजण शोधत आहेत.

मात्र आम्हाला एक कारण सापडले आहे. पराभवाचे हे ठोस कारण असू शकते, अशी शक्यता किंवा निव्वळ योगागोगही असू शकतो. सोशल मीडियावर याबाबत खमंग चर्चाही सुरू आहेत.

भारताच्या पराभवाचे कारण आहे पाकिस्तानी पत्रकार… तुमचा यावर विश्‍वास बसला नाही ना.. पण पाकिस्तानी क्रीडा पत्रकार झैनाब अब्बासने ज्या कर्णधारासोबत सेल्फी घेतला आहे तो संघ सामना हरल्याचा अजब योगायोग या स्पर्धेत दिसून आला आहे.

सध्या विराट कोहली आणि त्या पत्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झैनाबसोबत ज्या टीमचा प्लेअर किंवा कर्णधार सेल्फी काढतो ती टीम हरते, अशी एक सुरस कथा सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होते आहे. यामधली सत्यता पडताळून पाहावी लागेल.

पण आश्‍चर्याची बाब म्हणजे झैनाबने ज्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत ते खेळाडू एकतर शून्यावर बाद झालेत किंवा त्यांना मोठी खेळी करता आली नाही. तसेच पाकिस्तानसोबत सामना असताना झैनाबने प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत सेल्फी काढला तो संघ हरला आहे. आजही तसेच घडले.

युवराजसिंग आणि विराट कोहलीसोबत झैनाबने सेल्फी काढला. आता हे दोन सेल्फीच टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असल्याचे सोशल मीडियावर चर्चा आहे.

लॉर्डस् मैदानावर पाकिस्तानी फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करून ३३९ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. भारताचा डाव सुरू झाला तेव्हा एक-एक खेळाडू पटापट बाद होत तंबूत परतताना दिसले. भारतीय फलंदाज मोक्याच्या क्षणी ढेपाळले आणि रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला.

या दारूण पराभवाला झैनाबसोबत काढलेला सेल्फी कारणीभूत होता, असा एक विषय आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसेच झैनाबने युवराज आणि विराटसोबत काढलेले सेल्फीही व्हायरल होत आहेत. त्यामुळे झैनाब ही तिच्या पत्रकारीतेपेक्षा तिच्यासोबत खेळाडूंनी काढलेल्या सेल्फीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

हमे तो अपनो ने लुटा…!

चॅम्पियन्स ट्रॉङ्गीच्या ङ्गायनलमध्ये मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका होत आहे. पण याचवेळी कोट्यवधी चाहत्यांची मने भारताच्या हार्दिक पांड्याने मात्र जिंकून घेतली.

अवघ्या ४३ चेंडूत ७६ धावा ङ्गटकावणार्‍या पांड्याने तुङ्गानी ङ्गटकेबाजी करत टीम इंडियाची लाज राखली. दरम्यान, या पराभवानंतर पांड्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यानंतर पांड्या एवढा हताश होता की, त्याने सामना हारल्यानंतर तात्काळ म्हणजे रात्री १०.१५ वाजता (इंग्लंडमधील वेळेनुसार) एक टवीट केले.

पांड्याने या टवीटमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ‘हममे तो अपनो ने लुटा गैरो मे कहा दम था’ असे ट्विट त्याने केले. पांड्याचे या ट्विट मुळे नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता होती.

मात्र, हा धोका ओळखून त्याने काही मिनिटातच ते डिलिट केल्याचा दावा पाकिस्तानी वेबसाईड डेली पाकिस्तानने केला आहे.

LEAVE A REPLY

*