संवाद रथ यात्रेचे मराठा समाजातर्फे स्वागत

0

जळगाव ।  प्रतिनिधी :  मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रा मुक्ताईनगर व भुसावळ येथून जळगाव शहरात दाखल झाली. या यात्रेचे मराठा समाजातर्फे स्वागत करण्यात आले. एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देऊन संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच दि.26 रोजी विधानभवनाला घेराव घालून धडकणार्‍या या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.

शहरातील टॉवर चौक येथे रथ आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रा. डी.डी. बच्छाव यांनी वेळकाढूपणा न करता न्यायालयात टिकेल असे मराठा आरक्षण द्यावे, त्याच बरोबर शासनाने इतर मागण्या मान्य कराव्यात यात जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, शेतकर्‍यांच्या मुलांसाठी असलेली सारथी योजना त्याचबरोबर आंदोलनादरम्यान 15 हजार निरपराध मराठा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू असे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. राजेश पाटील, प्रा. संजय गरुड, योगेश पाटील, हिरेश कदम, राम पवार, प्रा. राजेंद्र देशमुख, केतन पाटील, प्रमोद पाटील, सुरेंद्र पाटील, धनंजय पाटील, भगवान शिंदे, सचिन पाटील, जयश्री बोरसे, शिवम पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*