तत्वत: कर्ज कर्जमाफी शेतकर्‍यांची थट्टा व जखमेवर मिठ चोळणारी : शिवसेना करणार परिपत्रकाची होळी

0
पाचोरा | प्रतिनिधी :  शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरले होते. शिवसेनाही शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर उभी राहिल्याने शेवटी राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला.
मुख्यमंत्र्यांनी तत्वत: कर्जमाफी चा निर्णय शेतकरी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करून घोषणा केली. या ऐतिहासिक निर्णयाचा पेटलेल्या शेतकर्‍यांनी कर्जमाफीवर विश्‍वास ठेवून आंदोलने थांबविली.

मात्र या घोषणे नंतर शासनाकडून तत्वत: कर्ज कर्जमाफी संदर्भात काढण्यात आलेल्या परिपत्रकातील अटी शर्थी व नियम हे शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे असून कर्जमाफी घोषणा झाली आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळतच नाही.

तसेच शिवसेनेच्या मते राज्य सरकारच्या घोषणेचा निर्णय राज्यातील शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेला नाही. म्हणून दि.१९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त व बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाज कारण व २० टक्के राजकारण या संकल्पनेतून या दिवशी सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक प्रत्येक गावात शेतकर्‍यांची दिशाभुल करणार्‍या कर्जमाफीच्या परिपत्रकाचे शेतकर्‍यांसमोर सामुहिक वाचन करणार असल्याचा शिवसेनेच्या बैठकीत ठराव करण्यात आल.

परिपत्रक वाचनानंतर त्याच ठिकाणी परिपत्रकाची होळी करण्यात येणार असल्याचे आ.किशोर पाटील यांनी शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

जोपर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळून त्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले.

राज्य शासनाच्या तत्वत: कर्जमाफी व शेतकर्‍यांना तातडीने दहा हजारांचे कर्ज वाटप संदर्भात आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर टिकेचा प्रहार करून प्रत्यक्षात कर्जमाफी  झालीच नसून  घोषणा झाल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी आ. श्री.पाटील म्हणाले की, या कर्जमाफी अल्पभुधारक व महाभुधारक शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या संदर्भात मिळणारा लाभ तसेच शेतकर्‍यांच्या कुटूंबातील व्यक्ती शासकिय सेवेत किंवा कर्ज लाभार्थी असल्यास त्यांना लाभ मिळू शकत नाही. असे असले तर देशाचे संरक्षण करणार्‍या शेतकर्‍यांची मुले सैन्यात असून ज्यांच्या भरवशायवर देश सुरक्षित आहे अशा भुमिपुत्रांना या कर्जमाफी लाभ मिळणार नसल्याने सैनिकांच्या वतीने राज्य शासनाच्या निर्णयाच्या निषेधाचे निवेदन माझ्याकडे देण्यात येणार असल्याचे आ.पाटील म्हणाले.

तसेच जिल्ह्यात सुमारे चार लाख नव्वद हजार जिल्हा बँकेचे शेतकरी सभासद आहेत. दि.३१ मार्च २०१७ अखेर दोन लाख ३२ हजार कर्जदार थकीत आहे. मात्र ३० जून २०१६ च्याच थकीत कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यात ११ तालुक्यातून आकडेवारी काढल्यास प्रत्येक तालुक्यातून तीन ते चार हजार शेतकरी म्हणजे ङ्गक्त सुमारे पन्नास हजार शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळू शको. कर्जमाङ्गी संदर्भात शासनाने जाहिर केलेल्या परिपत्रकातील नियम, अटी या जाचक स्वरूपाच्या असल्याने अल्पभुधारक, महाभुधारक शेतकर्‍यांसह विविध क्षेत्रातील कर्जदार, लाभार्थी यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्यनो हा प्रकार शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे असल्यचो मत आमदारांनी व्यक्त केले. शासनाच्या कर्जमापीच्या परिपत्रकाची जाहिर होळी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.

पत्रकार परिषद पसंगी नगराध्यक्ष संजय गोहील, जि.प.सदस्य पद्मसिंग पाटील, तालुकाध्यक्ष दिपक राजपूत, उप नगराध्यक्ष शरद पाटील, गणेश पाटील, शितल सोमवंशी, राम केसवाणी, सतीश चेडे, बापू हटकर, स्वयसहाय्यक राजू पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*