# Breaking # अमळनेरला पहाटेचा थरार : अज्ञात कारणाने पत्नीच्या हत्येचा प्रयत्न : पतीची आत्महत्या तर मुलीचा जळून मृत्यू

0

अमळनेर ​ |  प्रतिनिधी :  य़ेथील गलवाडे रोडवरील प्रताप मिल कंपाउंड परिसरातील अनिल खैरनार याने घरात पलंगावर झोपलेल्या पत्नीच्या गळ्याला सूरी लावून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न असफल झाल्याने पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करत पतीने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) पहाटे पाचच्या सुमारास घडली. य़ात ५ वर्षाच्या मूलीचाही भाजून मृत्यू झाला आहे

पत्नी अनिता खैरनार आणि या गंभीर जखमी झाल्या. तसेच मुलगी गंभीर भाजल्याने तिचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे बाबा बोहरी हत्येचे प्रकरण शमत नाही, तोवर अमळनेरला हादरा देणारी ही एकाच आठवड्यात दूसरी घटना घडल्याने अमळनेरकर सून्न झाले आहेत.

प्रताप मिल कंपाउंड परिसरातील अनिल खैरनार (वय ३८) याने आज पहाटे चारला त्याची पत्नी अनिता खैरनार (वय ३३) गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला. आई जळत असल्याचे पाहून मुलगी तनुजा (वय पाच) हिने मिठी मारली असता तीही गंभीर भाजली.

त्यानंतर अनिल खैरनारने डुबकी मारोती मंदिर परिसरात जावून भूसावळ सूरत रेल्वे मार्गावरून येणाऱ्या मालगाडी खाली झोतून जिव दिला रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांना घरातून धूर निघत असल्याचे दिसताच त्यांनी धाव घेतली असता अनिता खैरनार व त्यांची मुलगी भाजले होते.

शेजारील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविले. या घटनेत पत्नि गंभीर जखमी असून, धुळे येथे उपचार सुरू आहेत.तिच्या गळ्याला २०टाके पडले असून तिचे मात्र, मुलगी तनूश्री वय ५ हि चा गंभीर भाजल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल खैरनार हा माजी सैनिक असून दुसाने (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी आहे. तर सरिता खैरनार हिचे दहिवद ता अमळनेर येथील माहेर आहे त्याचे दूमजली घर असून दूस्ऱ्या मजल्याचे बांधकाम सूरू आहे काहि दिवसांपूर्वी तो सैन्यदलातून सेवा निवृत्त झाला होता

त्याचे पश्चात आई वडील बहिण भाऊ एक मूलगा असा परिवार आहे . या घटनेचे नेमके कारण गुलदस्त्यात असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. पती अनिल खैरनारचा मृत्यूची घटना मारवड पोलीसांचे हद्दीत तर पत्नी व मूलीची जळीत घटना अमळनेर पोलीसांचे हद्दीत घडली आहे

LEAVE A REPLY

*