मुक्ताईच्या पादूकांचे गोदावरीत स्नान : पालखीचा बीड जिल्ह्यात प्रवेश

0

जळगाव : प्रतितिनधी : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरातील संत मुक्ताईं मंदिर देवस्थानातर्फे पंढपुरला निघालेली पालखी आज सकाळी शहागड येथे पोहचली. तेथील गोदवरी नदीच्या पात्रात संत मुक्ताईंच्या पादुकांना विधीवत मंत्रोच्चारात स्नान घालण्यात आले.

तेथून पालखी बीड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. मंदिर संस्थानाचे रविंद्र महाराज हरणे, पुजारी सुधाकर पाटील व ज्ञानेश्‍वर हरणे यांनी या पादूकांना विधिवत स्नान घातले.

यावेळी मुक्ताई व विठ्ठलांची विविध भजने वारकर्‍यांनी सादर केलीत. टाळमृदंगाच्या स्वरात हे स्नान घालण्यात आले.

LEAVE A REPLY

*