वृद्धाश्रमासह रिमांड होममध्ये जीवनावश्यक साहित्यांचे वाटप

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री वैै. गं.भा. दगुबाई देवराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त तालुक्यातील सावखेडा येथील मातोश्री वृध्दाश्रमात जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख नाना सोनवणे, सचिन पवार, डॉ.कमलाकर पाटील, मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकूंद गोसावी उपस्थित होते.

सावखेडा येथील मातोश्री वृध्दाश्रमातील 70 ते 80 आजी आजोबा, विवेकानंद प्रतिष्ठाण संचलित श्रवण विकास मंदिर कर्णबधीर शाळेतील 150 विद्यार्थ्यांना तसेच बाल निरिक्षण गृहातील 140 बालके, लिलाई बालाश्रमातील 51 बालकांना जीवनाश्यक वस्तु तसेच विद्यार्थ्यांना 100 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक जाधव , बाल निरीक्षण गृह अधिक्षका सारीका मेतकर, उपअधीक्षक डिगंबर पाटील, कर्णबधीर शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, पाळधी युवा सेना शहरप्रमुख आबा माळी, बळीराम पाटील, भगवान पाटील, मंगल पाटील, पं.स.सदस्य तुषार महाजन, प्रविण पाटील, नंदू पाटील, धनंजय सोनवणे, दिलीप पाटील, पंकज पाटील, चंदन कळमकर, भैय्या पाटील, आदींसह आजी आजोबा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक नाना सोनवणे, सुत्रसंचालन माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील यांनी तर आभार मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, सारीक मेतकर यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*