मेहरुणमधील तरुणाची हत्या : शिरसोली आकाशवाणी प्रसारण केंद्राजवळील जंगलात आढळला मृतदेह

0
जळगाव| प्रतिनिधी : मेहरुण परिसरातील तरुणाची गळा चिरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली.
शिरसोली आकाशवाणी प्रसारण केंद्राजवळील जंगलात त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी रुग्णालयात मन हेलाविणारा आक्रोश केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेहरुण परिसरातील दत्तनगरमधील अशोक किराणाजवळील रहिवाशी  नावीद शफीकउद्दीन पिरजादे (वय१८) या तरुणाचा मृतदेह शिरसोलीजवळील जंगलात आढळला.
धारदार शस्त्राने गळा चिरलेला तसेच कमरेच्यावर दोन ठिकाण वार यावरुन त्याची हत्या झाल्याची अंदाज पोलीसांना लावला. आकाशवाणी प्रसारण केंद्राजवळुन वळणार्‍या रस्त्यावर मृतदेह पाहण्यासाठी शिरसोली येथील नागरीकांनी गर्दी केली. मात्र उशिरापर्यंत त्याची ओळख पटली नाही.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात  दुपारी १२.२७ वाजता मृतदेह सय्यदअली जावेद, शकील खान, समीर हमीफ खाटीक यांनी ओळखले. त्यांच्या सांगण्यावरुन नावीद यांच्या घरच्यांना बोलविण्यात आले. वडील शफीकउद्दीन पिरजादे यांनी मृतदेह पाहताच आक्रोश केला.

LEAVE A REPLY

*