सात भारतीय अभियंत्यांचे अफगाणिस्थानात अपहरण

0
नवी दिल्ली : उत्तर अफगाणिस्थानातील बागलान प्रांतात पॉवर स्टेशनकडे जाणार्‍या सात भारतीय अभियंत्याचे तालीबाण्यांनी अपहरण केले आहे.

उत्तर अफगाणिस्थानातील द अफगाण ब्रेशना शेरकट ही कंपनी पॉवर स्टेशनची उभारणी करत असते. या कंपनीत हे सात अभियंते नेाकरस होते. कंपनीने त्यांना पॉवर स्टेशन उभारणीसाठी पाठवले होते. एका मिनी बसम्धून ते जात असतांना त्यांना तालीबान्यांनी अडवून या सातही भारतीयांसह त्यांच्या अफगान चालकाचे अपहरण केले आहे. यातहील एकाशीही संपर्क अद्याप झालेला नाही अफगान पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये 150 पेक्षा जास्त भारतीय इंजिनीअर आणि टेक्निकल एक्स्पर्ट देशाच्या पायाभूत सुविधांसंदर्भातील प्रकल्पात काम करतात.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून या घटनेवर नजर असल्याचं म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये खंडणीसाठी अपहरणाच्या अनेक घटना घडतात. गरीबी आणि वाढती बेरोजगारी यामागचं प्रमुख कारण आहे. 2016 साली देखील एका भारतीयाचं अपहरण करण्यात आलं होतं, ज्याची तब्बल 40 दिवसांनी सुटका झाली.

LEAVE A REPLY

*