पुणे -कामाख्या दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे-कामाख्या साप्ताहिक सुविधा विशेष एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या गाड्यांना आंदल ऐवजी दूर्गापूर स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. चालविण्यात येणार्‍या गाड्यांमध्ये गाडी क्र ८२५०५ सुविध विशेष गाडी दर गुरुवारी दि. ६ जुलै ते २८ सप्टेबर २०१७ दरम्यान (१३ फेर्‍या) धावेल ही गाडी पुणेहून दि. १०.३० वाजता रवाना होऊन तिसर्‍या दिवशी दुपारी ३.२५ वाजता कामाख्या पोहचेल.

परतीदरम्यान गाडी क्र ८२५०६ सुविधा विशेष गाडी दर सोमवारी दि. ३ जुलै ते २५ सप्टेबर दरम्यान (१३ फेर्‍या) कामाख्याहून रात्री ११.०५ वाजता रवाना होऊन चौथ्या दिवशी (गुरुवार) पहाटे २.४५ वाजता पोहचेल.

ही गाडी प्रवासात पनवेल, नाशिकरोड, भुसावळ, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झार्सुगुडा, राऊरकेला, चक्रधरपुर, पुरुलिया, आसनसोल, दुर्गापुर, मालदा टाऊन, किशनगंज या स्थानकांवर थांबेल.

या गाडीला दोन एसी टू, तीन एसी थ्री, ८ स्लिपर, ४ द्वितीय श्रेणी डबे असतील. या गाड्यांचे आरक्षण सुरु असून प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*