स्व.मधुकरराव चौधरी यांची स्मृती स्फूर्ती देवून जाते : अरुणभाई गुजराथी

0
फैजपूर |  वार्ताहर :  एकविस वर्षाच्या राजकिय प्रवासात विविध महत्वाची खाती सांभाळतांना स्वच्छप्रतिमेचा नेता म्हणून लोकसेवक मधुकरराव चौधरींचा गौरव केला. विना अहंकाराचे व्यक्तीमत्व स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरींचा सर्वात मोइा अलंकार होता.

या प्रसंगी त्यांची स्मृती सार्‍यांनाच स्फूर्ती देऊन जाते असे उद्गार लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी श्रद्धेय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या ८९ व्या जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी बोलतांना केले.

फैजपूरच्या ऐतिहासिक भूमित बाळासाहेबांनी शिक्षण व संस्कृतीची रुजवात करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली  माजी विधानसभाअध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खा. उल्हास पाटील, माजी आ. रमेशदादा चौधरी, अरुणदादा पाटील, मधुकर कारखाना चेअरमन शरददादा महाजन, व्हाईस चेअरमन भागवतराव पाटील, जिल्हा दुधसंघाचे संचालक हेमराज चौधरी, जि.प. सदस्य निलम पाटील, प्रभाकर सोनवणे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे आदिंची व्यासपिठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यस्थानी माजी आमदार संस्थाअध्यक्ष शिरीषदादा चौधरी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी केले. त्यांनी स्व. बाळासाहेब चौधरी यांचा जिवनपर उलगडतांना अनेक आठवणींना जागे केले.

प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी बाळासाहेबांच्या इतिहासात नोंद घेतल्या जाणार्‍या उपक्रमांना शिक्षणमंत्री असतांना श्‍वेतपत्रिका आणि इतर खात्याचे मंत्री असतांना जळगाव आकाशवाणी, दुधफेडरेशन, साहित्य संमेलनाचे आयोजन, कारखाना, हिंदीभाषा प्रचार व प्रसार समिती इ. मोलाच्या दगड ठरलेल्या घटनांचा उल्लेख केला.

यावेळी माजी खा. उल्हास पाटील यांनी राजकारणांतला प्रेरणास्तंभ म्हणून बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा गौरव केला. कार्यक्रमाची सुरवात सुरज बारी व उत्पल चौधरी यांच्या भक्तीवंदनेने झाली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्व. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, प्राचार्य आर.एल. चौधरी, प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ.सागर धनगर यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हाबँक संचालक रविंद्रभैय्या पाटील, फैजपूर नगराध्यक्षा सौ. महानंदा होले, माजी नगराध्यक्ष मिलींद वाघुळदे, संस्था उपाध्यक्ष दामोधर पाटील, चेअरमन लिलाधर चौधरी, एम.टी. फिरके, व्हाईस चेअरमन के.आर. चौधरी, हरचंद भंगाळे, ईस्माई तडवी, रमेश टेकाडे, मिलींद नेहते, संजय पाटील, भागवत पाचपोळ, प्रभात चौधरी खिरोदा, बारसू नेहते, दिनूनाना पाटील, अनिल महाजन यासह असंख्य यावल-रावेरसह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*