Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच क्रीडा मुख्य बातम्या

प्रसारमाध्यमं आणि लोकांशी नम्रतेनं वाग : बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची विराटला तंबी

Share
मुंबई :   प्रसारमाध्यमं आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेनं वाग, अशी तंबी समितीनं विराटला दिली आहे.भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं क्रिकेट चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, २१ नोव्हेंबरपासून यजमानांविरुद्ध टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
भारतीय फलंदाजीत विशेष काहीच नाही. त्यांच्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात, असं एका चाहत्यानं म्हटलं होतं.
त्यावर विराट कोहलीचा पारा चढला आणि त्यानं क्रिकेट चाहत्याला थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला. परदेशी खेळाडू आवडत असतील तर खुशाल देश सोडून जा, असं विराटनं म्हटलं होतं. त्यावर विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनंही विराटला धारेवर धरल्याचं समजतं.
समितीतील सदस्यांनी विराटशी फोनवरून चर्चा केली. आक्रमकपणा प्रसारमाध्यमं आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेनं वाग, अशी ताकीद दिली. भारतीय कर्णधारपदाला साजेसं असं वर्तन असायला हवं, असा सल्लाही समितीनं दिला.
त्यावर विराटनं काय उत्तर दिलं हे समजू शकलेलं नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!