Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

खातेधारकांसाठी ईपीएफओ गृहयोजना सुरू करणार

Share

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या खातेधारकांसाठी लवकरच गृहयोजना सुरू करणार आहे. त्यामुळे सदस्यांना स्वस्तात घर मिळणार आहे.

ईपीएफओनं गृहयोजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. तो सीबीटीच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी) डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत सादर केला जाणार आहे. त्यात मंजुरी मिळाल्यास गृहयोजनेचं काम सुरू होईल.

 

आगामी लोकसभा निवडणुकांआधी ही गृहयोजना सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत खातेधारकांना स्वस्त घरं मिळावीत, हा त्यामागचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चितच असणार आहेत, असं ईपीएफओचे सदस्य विरजेश उपाध्याय यांनी सांगितलं.

ईपीएफओनं तयार केलेल्या प्रस्तावानुसार नॅशनल हाउसिंग असोसिएशन स्थापन करण्यात येईल. ही संघटना सर्व राज्यांत भूसंपादनाचं काम करणार आहे. राज्यांकडून स्वस्त दरांमध्ये जमीन खरेदी केली जाईल. त्यानंतर बांधकाम कंपन्यांशी चर्चा होईल. घर खरेदीसाठी ईपीएफओ कर्जही उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पांसाठी जेवढा खर्च होईल, त्यानुसार घरांच्या किंमती ठरवण्यात येतील.

ज्या  खातेधारकांकडे स्वतःचं घर नाही, अशांनाच या योजनेंतर्गत घरं मिळणार आहेत. लाभार्थ्याचं किमान ३ वर्षे जुने खाते असावे. घर खरेदीसाठी पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येईल. कर्जावरील ईएमआय पीएफ खात्यातूनच वळते केले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!