Photo Gallery : जळगावच्या डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशसोहळा

0
जळगाव | प्रतिनिधी : सर्व मुलांचे कपडे एकसारखे,अनेक अनोळखी चेहरे,कधीही न पाहीलेली शाळा त्यामुळे भांबावून गेलेले चेहरे, जवळ नसलेले आईबाबा यामुळे घाबरून जात कोसळलेले रडू , तर अरे बाळा रडू नकोस, हा बघ हा खाऊ घे, हे खेळणे घे, हे बघ रेल्वे आली, भूर्र.. जायचं ना, मामाकडे अशा प्रेमळ सुरात रडणार्‍या आणि वर्गातून पळ काढणार्‍या मुलांना समजवणार्‍या शिक्षिकातर आलेल्या विद्यार्थ्याला देण्यात येणारे गुलाबपुष्प असे सारे दृश्य बघायला मिळाले ते येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळ्यात.

यासाठी प्रभारी प्राचार्य योगीता शिंपी, सीमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध गोष्टी सांगीतल्यात. तर अनघा खारूल, रंजना बाभुळके यांनी बालगीते सादर केलीत. स्वाती बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयीका चंचल रत्नपारखी, जयश्री वंडोळे, सचिन गायकवाड यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*