अशोक किराणा ते काशिनाथ हॉटेलपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था

0
प्रभागात क्र.33 मध्ये अशोक किराणा ते काशिनाथ हॉटेलपर्यंत मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डेच खड्डे पडले असून अपघाताच्या घटना देखील घडू लागल्या आहेत. रस्त्यावरील धुळ उडत असल्याने श्वसोश्वास घेण्यासहीत त्रास होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी व्यक्त होवू लागली आहे.

अशोक किराणा ते काशिनाथ हॉटेलपर्यंत मुख्य रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी महापालिकेला निवेदन दिले आहे. परंतु प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

सद्यस्थितीला या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाल्यामुळे डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे. या रस्त्यावरुन जातांना धुळ उडत असल्याने श्वसनाचा आजार बळावण्याची शक्यता आहे. प्रभागात अंतर्गत रस्त्यांचा, काही ठिकाणी गटारींचा अभाव आहे.

त्यामुळे विकासकामे व्हायला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होवू लागली आहे. संतोषी माता मंदिर चौकात कर्ल्व्हट नसल्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी कर्ल्व्हटची गरज असतांनाही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नगरसेवक पाठपुरावा करत असूनही प्रशासनाकडून का दुर्लक्ष केले जाते.

असा सवाल देखील उपस्थित होत आहे. प्रभागातील नाल्याचीही समस्या सर्वात मोठी आहे. नालाबंदीस्त झाल्यास आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे. मास्टर कॉलनी ते मोठ्या नाल्यापर्यंत, त्रीवेणी माता मंदिर ते श्रीराम कॉलनीपर्यंत नाल्याच्या कडेला संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात पुरसदृष्य परिस्थिती उद्भवते. त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होवू लागली आहे.

विकासकामांबाबत नगरसेवकांचा दावा
प्रभाग क्रमांक 33 मधील संतोषी माता मंदिराजवळ आणि त्रीवेणी माता मंदिर चौकात हायमास्ट लॅम्प लावण्यात आले आहे. गट नं.254 मध्ये, मुकेश टेन्ट हाऊसजवळ, रामनगरमध्ये कर्ल्व्हट करण्यात आले आहे. रामनगर, उपासनीनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पटेल दवाखाना ते केजीएन डेअरी, दत्तरोडमध्ये गटारी करण्यात आले आहे. त्रीवेणी माता मंदिराजवळ, श्रीराम कन्या शाळेजवळ पुलाचे बांधकाम करण्यात आले.

हॉटेल कस्तुरी ते मेहरुण बुरुजपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. लक्ष्मी नगरात आ.राजूमामा भोळे यांच्या निधीतुन गटारी आणि सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली. त्रीवेणी माता मंदिर ते अशोक किराणा, मास्टर कॉलनी गटरी करण्यात आल्या. लक्ष्मीनगरात नवीन ट्रान्सफार्मर मंजुर झाले आहे. मास्टर कॉलनी ते मोठ्या नाल्यापर्यंत 5 फुट रुंद गटार बांधणे, लक्ष्मीनगरातील रस्त्याचे डांबरीकरण त्रीवेणी माता मंदिर ते श्रीराम कॉलनीपर्यंत नाल्याला संरक्षणभिंत बांधणे, प्रभागात एलईडी लाईट लावणे, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे. मेहरुण गाव बुरुजजवळ पुल बांधण्याचे काम प्रस्तावित आहे.

प्रभागातील समस्या आणि वस्तुस्थिती
प्रभाग क्रमांक 33 मध्ये पाहणी केली असता प्रभागात नाल्याची समस्या गंभीर आहे. संतोषी माता चौकात कर्ल्व्हटची गरज आहे. काही ठिकाणी गटारी नसल्यामुळे कच्चा पाटचार्‍या केलेल्या आहेत. सफाई अभावी तुंबलेल्या राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. मेहरुण बुरुजजवळ पुलाची उंच वाढविणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात संपर्क तुटत असल्याने पुल बांधणे आवश्यकच आहे. संतोषी माता मंदिर चौक ते काशीनाथ लॉजपर्यंत रस्त्याची प्रचंड मोठी समस्या आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. धुळ उडत असल्याने श्वसनाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतोषी माता मंदिर चौक परिसरात साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून आले. कचरा कुंड्या दिसून आल्या नाही.

LEAVE A REPLY

*