जपानमध्ये लिफ्ट मागणार्‍या ‘भुतां’ची दहशत !

0
टोकियो | वृत्तसंस्था :  भुताखेतांचे किस्से जगभरात सांगितले जातात. हल्ली तर सीसीटीव्ही कॅमेरे, छायाचित्रे, व्हिडीओ दाखवूनही भुतांचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.

जपानमध्ये आता एका विशिष्ट ठिकाणी टॅक्सीवाल्यांना ‘लिफ्ट’ मागणार्या भुतांची चर्चा आहे. तोहोकू नावाच्या ठिकाणी अनेक वेळा स्त्री किंवा पुरुष भुताने लिफ्ट मागितली आणि गाडीत पाहता पाहता ते अदृश्य झाले, असे या टॅक्सीवाल्यांचे म्हणणे आहे.

तोहोकूमध्ये आता कुणी लिफ्ट मागत असेल तर वाहनचालक सावध होतात. याचे कारण म्हणजे टॅक्सी किंवा अन्य वाहनांबाबत लिफ्ट दिल्यानंतर विचित्र घटना घडल्याचे सांगितले जाते.

२०११ च्या त्सुनामीमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले होते. अनेकांचे मृतदेह सापडले, अनेक अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांचीच ही पिशाचे आहेत, असा स्थानिक समज आहे.

याठिकाणच्या अशा डझनभर टॅक्सीचालकांची एक मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे किस्से सांगितले. लिफ्ट दिल्यानंतर मध्येच किंवा पैसे मागत असताना पाहता पाहता गायब होणे, कार भलत्याच दिशेने जाऊ लागणे अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्याचे या टॅक्सीचालकांचे म्हणणे आहे.

काही लोक तर सीसीटीव्हीमध्ये लिफ्ट मागत असताना दिसलेली व्यक्ती भूतच होती, हे ङ्गोटो दाखवून सांगत आहेत. आता या भागात टॅक्सी नेण्यास अनेक चालक कचरत आहेत.

LEAVE A REPLY

*