Blog : पेट्रोल-डिझेल : नवा दिवस, नवा दर!

0
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज जाहीर करण्याचा प्रयोग देशातील पाच शहरांमध्ये करण्यात आला. आता संपूर्ण देशभरात त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे.

इंधन दरवाढीच्या नावाखाली वाढणारी मागणी आणि महागाई इंधनाचे दर कमी झाल्यास कमी मात्र होत नाही. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय चांगला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ-घट ही बातमी सर्वसामान्य वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. येत्या १६ तारखेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज निश्‍चित करण्यात येणार आहेत.

अमेरिका, कॅनडा, युरोप आणि सर्व आखाती देशांमध्ये दिवसाची सुरुवात होत असताना या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव घोषित केले जातात आणि ते २४ तास लागू राहतात. आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक पंधरवड्याला बदलतात.

अशा स्थितीत पेट्रोलियम कंपन्यांनी पूर्वीच्या पंधरवड्यात अधिक तोटा सहन केला असेल तर पुढील पंधरवड्यात तो भरून काढण्यासाठी दरात अवास्तव वाढ करण्यात येते किंवा मागील पंधरा दिवसांत जास्त नङ्गा कमावला असेल तर अचानक मोठी दर कपात होते.

त्यामुळे बाजारभावात स्थिरता राहत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताच आपोआप महागाई वाढते. परंतु पेट्रोल, डिझेलच्या दरात थोडीङ्गार कपात झाली तर मात्र महागाई त्या प्रमाणात कमी होत नाही, असा अनुभव आहे.

गगनाला भिडत असलेली महागाई आटोक्यात आणणे हाच या निर्णयामागील हेतू असल्याचे तूर्त तरी दिसते आहे. इंधनाच्या दरवाढीचे कारण सांगून बाजारभाव अचानक वाढवणे आणि नंतर इंधनाचे दर कमी झाल्यास वस्तूंचे भाव मात्र तसेच ठेवणे या वृत्तीला यामुळे लगाम बसू शकेल.

जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज निश्‍चित केले जातील तेव्हा महागाई अचानक वाढण्यासाठी इंधन दरवाढीचे कारण सांगता येणार नाही. वाढत्या महागाईला अंकुश लागेल. बाजारातील नङ्गेखोरी रोखण्याची कोणतीही यंत्रणा सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होताच बाजारभाव कमी होतील, अशी आशा करणे चुकीचे ठरते.

परंतु कमीत कमी मोठ्या व्यापारी संस्था तरी इंधन दरातील मोठ्या ङ्गरकाचा गैरङ्गायदा घेऊ शकणार नाहीत, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पेट्रोल, डिझेलचे दर रोजच्या रोज जाहीर करण्याचा आणखी एक ङ्गायदा म्हणजे पंपचालक ग्राहकांची दिशाभूल करून अधिक ङ्गायदा उकळू शकणार नाहीत.

देशभरात जवळपास ८५ हजार पेट्रोलपंप आहेत आणि त्या सर्वच पंपांवर गैरप्रकार होतात, असे कोणी म्हणू शकणार नाही. परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पेट्रोलपंपांच्या गैरकारभाराच्या तक्रारींमुळे नुकतेच जे अभियान राबवले त्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आले होते, हेही विसरता येणार नाही.

अगदी रिमोटच्या सहाय्याने पेट्रोल-डिझेलच्या मीटरमध्ये ङ्गेरङ्गार होत असल्याचेही समोर आले होते. अर्थात गैरप्रकार उघड झालेले बहुतांश पेट्रोलपंप नेत्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे किंवा प्रभावी व्यक्तींच्या मालकीचे होते हा भाग वेगळा! पेट्रोलचे दर रोजच्या रोज निश्‍चित करण्याची प्रथा स्वीकारल्यानंतर हे गैरप्रकार कमी होतील, अशी आशा आहे.

नव्या निर्णयाचा ङ्गायदा पेट्रोलियम कंपन्यांनाही होणार आहे. सद्यस्थितीत एकदा जाहीर केलेल्या दराने पेट्रोलियम कंपन्यांना किमान पंधरा दिवस पेट्रोल, डिझेल विकावे लागते. या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठे ङ्गेरबदल झाले तर पेट्रोलियम कंपन्यांना अचानक मोठा तोटा सहन करावा लागतो.

याउलट आंतरराष्ट्रीय बाजारात दरात कपात झाली तर कंपन्यांना अचानक धनलाभ होतो. हा ङ्गायदा किंवा तोटा पुढील पंधरवड्यात थेट उपभोक्त्यांपर्यंत हस्तांतरित केला जातो. त्यामुळेच १६ जूनपासून देशात जो महत्त्वाचा बदल होणार आहे तो चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही.

या बदलाचा निर्णय घाईगडबडीत घेतला जात आहे, असेही नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज निश्‍चित करण्याच्या निर्णयाची चाचणी पाच मोठ्या शहरांमध्ये घेण्यात आली आहे. पुद्दुचेरी, विशाखापट्टणम्, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगडमध्ये या चाचणीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे.

या चाचणी प्रयोगात पेट्रोलपंपचालकांना आणि ग्राहकांना कोणतीच अडचण आली नाही आणि पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करणार्‍या कंपन्यांना कोणताही त्रास झाला नाही. पेट्रोलपंपांवरील कर्मचार्‍यांच्या कामावरही या चाचणीचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसले नाही.

अर्थात प्रयोग यशस्वी झाल्याचे हे दावे अवाजवीही असू शकतात. परंतु बदलाला विरोध झाला नाही, हेही खरे आहे. परंतु ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की हा संपूर्ण बदल माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून केला जाणार आहे.

पेट्रोलच्या दरात झालेला बदल पेट्रोलियम कंपन्यांनी निर्णयानंतर जास्तीत जास्त पाच मिनिटांच्या आत सर्व पेट्रोलपंपांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. निर्णय देण्यास थोडा जरी विलंब झाला तरी पेट्रोलपंपांवर रांगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला लागू शकते.

पेट्रोलियम कंपन्यांनी रोजचे दर कळवण्यास विलंब केला तर पेट्रोलपंपांवर प्रचंड गोंधळ उडू शकतो. हे भाकित अशासाठी करावे लागते की ज्या पाच शहरांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली त्यापैकी एकही शहर प्रचंड लोकवस्तीचे नव्हते.

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता अशा लोकसंख्येने आणि आकाराने मोठ्या असणार्‍या शहरांचा या प्रयोगात समावेश नव्हता. त्यामुळे येत्या १६ तारखेपासून अशी काही समस्या उद्भवते का? की कोणतीही समस्या उद्भवणार नाही? समस्या निर्माण झालीच तर काय उपाययोजना तातडीने केल्या जातात, हे पाहावे लागेल.

त्याशिवाय या प्रयोगाचे खरे यशापयश समजू शकणार नाही. अन्यथा हा निर्णय चांगला आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यताही बर्‍यापैकी आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज जाहीर केल्यामुळे तेल कंपन्यांनाही ङ्गायदा होईल, पेट्रोलपंपचालकांनाही होईल आणि अंतिमतः ग्राहकालाही ङ्गायदाच होईल, असे आतातरी वाटते आहे.

  • अभिजित कुलकर्णी

LEAVE A REPLY

*