गोदावरी संगीत महाविद्यालय आयोजित मृगोत्सवात विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराच्या सरी

0

जळगाव |  प्रतिनिधी : मेघा रे मेघा रे, रिमझिम रिमझिम सावण बरसे, घन आज बरसे, पावसात वेडे मन मोर नाचते, रिमझिम रिमझिम पाऊस आला यासारख्या पाऊस गितांनी तसेच नृत्य, कॅसिओ, तबलावादनाच्या जुगलबंदीने मृगोत्सव या संगित कार्यक्रमात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

गोदावरी संगित महाविद्यालयात व सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यामाने मृगोत्सव कार्यक्रमाचचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रियंका पाटील, डॉ. प्राची सुरतवाला, गोदावरी आई उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात कथक विभागाच्या विद्यार्थीनींनी रिमझिम सावन बरसे या गीतावर सुरेख नृत्य सादर करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभदा नेवे यांनी सुत्रसंचलन वरुण नेवे, वैष्णवी म्हाळस यांनी केले. तर आभार महिमा जैन यांनी मानले. यशस्वितेसाठी राजू पाटील, अनंता साठे, राहुल विवचे, किशोर पाटील, राजेश साठे, ईश्‍वर पाटील यांनी घेतले.

या कलावंतांनी केले सादरीकरण

मृगोत्सव या कार्यक्रमात श्रेया पाटील, शानवी शाह, सेजल चौधरी, हर्षिता भोरटके, कुंजल चौधरी, अंकिता हरणकर, प्रांजल जगताप, वरुण नेवे, विकी सोनवणे, चैताली सोनार, ऋतूराज जोशी, पियुषा नेवे, उत्कर्ष जैन, प्रियंका म्हाळस, श्रद्धा ओवे, रोहीणी पाठक, प्रिया बुरुकूले, श्रृती भिंगारे, रितीका मांडगे, दर्शना काथार, स्वाती अहिरराव, ललिता अमृतकर, सरला वाघ, सुनिल चौधरी, चंद्रकांत पाटील, ईश्‍वर निंभोरे, अथर्व जगदाळ, अनिकेत गाजरे, संहिता जोशी, विभोर वाणी, राघव माळी, श्‍लोक सुर्यवंशी, पियुषा नेवे, रंजना वाणी, सृष्टी भागवत, ृसृजल भागवत, गौतमी मैराळे, मयुरी चौधरी, अदिती शिंदाडकर, वेदश्री चौधरी, जयश्री बयास, ओजल पाटील, वैष्णवी आंबोदकर, शर्वरी देशमूख, श्रद्धा चौधरी, पुर्वा आटाळे, कशिश भगवानी, गौरी झंझणे, चैताली सोनार यांनी गितांचे व नृत्यांचे सादरी करण केले. त्यांना कॅसिओ, हार्मोनिअम व तबल्यावर साथसंगत ज्ञानेश चौधरी, गितेश पाटील, प्रतिक सोनवणे, प्रितम निकुंभ, आदित्य पाटील, सारण्य बोरसे, युवराज निंभोरे, प्रवण अहिराव, कृणाल गजकुंश, यानी केले.

LEAVE A REPLY

*