मुंबईकडून पराभव होताच ट्रेंडमध्ये आला युवराज

0
मुंबई । मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. या पराभवानंतर पंजाबचा युवराज सिंग टे्ंरड मध्ये आला.

युवराज सिंग आणि कर्णधार अश्विनच्या नेतृत्वाला पंजाबच्या पराभवासाठी चाहत्यांनी जबाबदार धरले आहे. जेव्हा युवराज खेळपट्टीवर आला तेव्हा पंजाबला विजयासाठी 9 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता होती. केवळ तीनच चेंडू युवराज खेळला आणि त्यामध्ये केवळ 1 धाव तो करु शकला.

परिणामी पंजाबला पराभाचा सामना करावा लागला.पंजाबचे चाहते पंजाबचा पराभव होताच युवराज सिंगवर चांगलेच संतापले. युवराजवर सोशल मीडियामध्ये चाहत्यांनी राग व्यक्त केला.

त्याला अनेकांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. युवराजच्या काही चाहत्यांनी त्याचा बचाव करताना अश्विनला पराभवासाठी जबाबदार धरले. अक्षर पटेलला कर्णधार अश्विनने युवीच्या आधी फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी तोंडसूख घेतले. युवराज सिंग बराच वेळ टिवटरवर ट्रेंड होत होता.

LEAVE A REPLY

*