प्रशिक्षितांनी व्यवसायाकडे वळावे – आ .खडसे :

0
मुक्ताईनगर, |  वार्ताहर :  भारतात भाजपाचे सरकार आल्यानंतर व्होकेशनल एज्युकेशनचे नामकरण करून स्कील एज्युकेशन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षित युवकाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्यातरी कुशल कारागिराने नोकरीच्या मागे न लागता स्वयं रोजगारकडे वळावे असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे अप्रेंटीस धारकांना प्रमाणपत्र वाटपा प्रसंगी केले.

जळगांव येथील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण कार्यालय यांच्या वतीने आज १५ रोजी मुक्ताईनगर येथील ग.सु.वराडे आय.टी.आय. येथे शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटीस) पुर्ण केलेल्या उमेदवारांना खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे हे होते.

आ . खडसे म्हणाले की, मध्यंतरी या प्रमाणपत्रावर राजमुद्रा छापणे बंद करण्यात आले होते . परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते पुन्हा सुरु केले. देशभरातील अप्रेंटीस पुर्ण केलेल्या उमेदवारांना गेल्या चार वर्षापासुन प्रमाणपत्र मिळत नव्हते त्यामुळे त्यांना नोकरी पासून वंचित राहावे लागत होते.

परंतु या चार वर्षात सातशे खासदारांपैकी कुणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. पण खासदार रक्षाताई खडसे यांनी संसदेत हा प्रश्न लावून धरला त्यामुळे याविभागाचे मंत्री ना . राजीव प्रताप रुडी यांनी तत्काळ दखल घेऊन सदर प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिलेत.

दिपनगर येथे देखील अप्रेंटीस झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रमाने नोकरीत सामावून घेण्यासाठी व जागा राखीव ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणार आहे.

यावेळी खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की ; आ.एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१३ पासून प्रलंबित असलेल्या प्रमाणपत्रा विषयी संसदेत प्रश्न उपस्थित केले त्याची मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी तत्काळ दखल घेतली आणि काही दिवसातच प्रमाणपत्रांची वाटप सुरु झाली. असे देशभरात जवळपास ३ लाख उमेदवार प्रमाणपत्रा पासुन वंचित होते.

त्याच प्रमाणे आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांना रेल्वे आणि ऑर्डनन्स ङ्गॅक्टरीत स्थानिक मुलांनाच नोकरीत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. यासाठी जळगांव जिल्ह्यातील अप्रेंटीस पुर्ण केलेल्या उमेदवारांनी रोजगार उभारावा यासाठी बोलणे सुरु आहे .

त्यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. त्याच प्रमाणे त्या उमेदवाराकडे स्कील आहे त्यांनाच पुढे जाण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करावा. तसेच छोटे मोठे उद्योग सुरु करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी विचारमंचावर मुक्ताईनगर तालुका एज्यु. सोसायटीचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.बी.वाघमारे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, संचालक विलास धायदे, भुसावळ आय.टी.आय. चे प्राचार्य व्ही . आय . तायडे, सहा.प्रशिक्षण सल्लागार श्री.कोठावदे, ग.सु.वराडे आय.टी.आय. चे प्राचार्य एस.पी.पाटील आदी उपस्थित होते .

यावेळी प्रतिनिधी स्वरूपात दहा उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक सतीश चौधरी यांनी तर आभार श्री.कोठावदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*