मध्यावधी निवडणुकीवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतक-यांना द्या – उध्दव ठाकरे

0
शेगांव, |  प्रतिनिधी : मध्यावधी निवडणुकींवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांना देवून सातबारा कोरा करा नंतर मध्यावधी घ्या असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज स्थानिक कृष्णा कॉटेज येथे  आयोजीत शेतकरी व शिवसेनेच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात केले.

कर्जमुक्तीला ङ्गाटा म्हणजे मध्यावधीचे वक्तव्य. मध्यावधीसाठी पैसा आहे आणि शेतकर्‍यांना द्यायला नाही. मध्यावधीसाठी लागणारा सर्व पैसा शेतकर्‍यांना द्या असेही त्यांनी सुचित केले. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर आज उध्दव ठाकरे संतनगरीत आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

मंचकावर ना.रामदास कदम, ना.दिवाकर रावते, ना.दिपक सावंत, ना.गुलाबराव पाटील, आ.निलमताई गोर्हे, विनायक राऊत, खा.चंद्रकांत खैरे, खा.प्रतापराव जाधव, खा. भावनाताई गवळी, आ.डॉ.संजय रायमुलकर, आ.डॉ.शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जालिंधर बुधवंत, मा.आ.विजयराज शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष लिप्ते, शांताराम दाने, तालुकाप्रमुख रमेश पाटील, संतोष घाटोळ, नगरसेवक दिनेश शिंदे, आशिष गणगणे, शैलेष डाबेराव, सौ.छायाताई पल्हाडे यांची उपस्थिती होती.

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना नेहमीच शेतकर्‍यांसाठी लढत आली असून यापुढेही लढत राहील असे म्हणत शेतकर्‍यांना हमीभाव नाही आणि सरकारची काही हमी नाही.

साले म्हणणार्‍यांना शेतकरी रडवणार असा खरपुस समाचार त्यांनी घेतला. निवडणुकीच्या अगोदर काय बोलायचे आणि निवडूण आल्यानंतर दुसरेच बोलायचे असे करणारी शिवसेना नाही.

शब्द देण्यापुर्वी दहा वेळा विचार करतो मग दिल्यावर प्राण गेल्यावरही शब्द खाली पडू देत नाही असेही त्यांनी सांगितले. दुष्काळात शिवसेना व शिवसैनिक नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी होता.

आताही आहे आणि नेहमीच राहील. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझेखाली दबल्याने मुला-मुलींच्या लग्नाचा यक्ष प्रश्न असतांना आत्महत्या होत होत्या. त्यामुळे शिवसेनेने शेतकर्‍यांसाठी सामुहीक विवाह लावले आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीमुळे अनेकांना प्रचंड त्रास झाला.

तुमच्या साक्षीने राजकीय भुकंप कधीही करू शकतो असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला. कर्जमुक्तीच्या अगोदर शेतकर्‍यांना १० हजार रूपये पेरण्यासाठी मिळाले पाहिजे ही ठाम भुमिका शिवसेनेने मांडली व ती करून घेतली आहे.

सरकारने केलेली घोषणा अमंलात आणण्याची सरकारला सुबूध्दी द्या, यावर्षी पिकपाणी व्यवस्थत होवून माझा शेतकरी सुखी राहू द्या अशी प्रार्थना श्री चरणी केली आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*