हॉटेलचे बिल ब्रेकअपचे कारण : दीपिका पदुकोणने उलगडला सिध्दार्थ सोबतचा जीवनप्रवास

0

मुंबई |  वृत्तसंस्था :  दीपिका पदुकोण या सौंदर्यवती अभिनेत्रीला आणखी एका कारणामुळे प्रसिद्धी मिळाली. ती म्हणजे तिची प्रेमप्रकरणं.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये निहार पंड्यापासून ते अगदी क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतच्या नात्यामुळे दीपिकाच्या नावाच्या बर्‍याच चर्चा पाहायला मिळाल्या.

यामध्येच तिचं बहुचर्चित प्रेमप्रकरण ठरलं ते म्हणजे मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या मुलासोबतचं. सिद्धा्रर्थ मल्लया आणि दीपिका जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

२०११ मध्ये आयपीएल सामन्यांदरम्यान दीपिका-सिद्धार्थला बर्‍याचदा एकत्रही पाहिलं गेलं आहे. त्यावेळी त्या दोघांचंही वागणं पाहता ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ हाच मंत्र ते दोघं फॉलो करताहेत की काय असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. त्यात सिद्धार्थने दीपिकाला आयपीएल सामन्यादरम्यान किस केल्यामुळे तर त्यांच्या प्रेमावर अनेकांनाच विश्वास बसला.

त्यानंतर बर्‍याच कार्यक्रमांमध्ये दीपिका- सिड एकत्र दिसू लागले. कोणाचीही तमा न बाळगता त्या दोघांचं हे असं वागणं सुरुच ठेवलं.

सर्व काही सुरळीत सुरु असतानाच एक दिवस अचानच या दोघांच्याही नात्याला तडा गेला. एका मुलाखतीमध्ये दीपिकानेच या ब्रेकअपचं कारण स्पष्ट केलं.

आर्थिक परिस्थिती आणि राहणीमान या मुद्द्यांवरुन या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं तिने स्पष्ट केलं. सिद्धार्थ- दीपिकाचा ब्रेकअप झाला त्यावेळी ती चित्रपटसृष्टीत नावारुपास येण्यास सुरुवात झाली होती.

तर, सिद्धार्थचे वडील म्हणजेच विजय मल्लया त्यांच्या कर्जबुडवेपणामुळे गोत्यात आले होते.

अशातच ते दोघं ज्यावेळी बंगळुरुच्या ताज हॉटेलमध्ये गेले होते त्यावेळी दीपिकालाच सर्व बिल भरण्यास त्याने सांगितलं होतं. सिद्धार्थचं हे असं वागणं तिला मुळीच पटलं नाही. हे कारण सांगत दीपिकाने आणखी एक कारण देत त्यांच्या नात्याची एक वेगळी बाजू सर्वांसमोर मांडली.

‘एकदा त्याने मला ऑटोरिक्षाने एका ठिकाणी नेलं होतं. त्यानंतर जेव्हा मी त्याला एक ड्रेस घ्यायला सांगितला तेव्हा सर्वसामान्य मार्केटमध्ये तो मला घेऊन गेला. तिथे सेल लागलेल्या एका ठिकाणी नेऊन त्याने मला आवडलेल्या कपड्यांच्या दरात घासाघीस केली.

हे सर्व पाहून त्या ठिकाणी मला प्रचंड संकोचलेपणा वाटू लागला होता’, असं दीपिका त्या मुलाखतीत म्हणाली होती. या सर्व प्रकारानंतर दीपिकाने तिचं रिलेशनशिप स्टेटस ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ बदलून ‘सिंगल’ असं ठेवलं होतं.

दीपिकाच्या स्टेटस अपडेटनंतर बॉलिवूड वर्तुळातही बर्‍याच चर्चा रंगल्या होत्या.

सिद्धार्थसोबतच्या नात्याला तडा गेल्यानंतर दीपिकाने तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केलं. ब्रेकअपनंतर त्या दोघांनीही सहसा प्रत्यक्षरित्या एकमेकांसमोर येणं टाळलं.

सध्या दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहता बी- टाऊनचे हे ‘बाजीराव- मस्तानी’ मोस्ट हॅपनिंग कपल ठरत आहेत.

LEAVE A REPLY

*