जिवन प्राधिकारण अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पालिकेत झाली अमृत योजनेबाबत बैठक : संभावित ठेकेदारांच्या अडचणींचे निरसन

0
भुसावळ | प्रतिनिधी | नगरपालिकेच्या महत्वपूर्ण अमृत योजनेच्या संभावित ठेकेदारांची बैठक जीवन प्राधिकारण विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थिती  घेण्यात आली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत ठेकेदारांच्या विविध समस्या व शंकांचे निरसन करण्यात आले.

दुपारी पालिका सभागृहात आयोजित बैठकीला संभावित ठेकेदारांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे एक्झिकेटीव्ह इंजिनिअर एस.पी. निकम,अकाउंटंट पाटील, शाखा अभियंता सचिन डहाके,डेप्युटी इंजिनिअर अत्तरदे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी बी.टी. बविस्कर, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, गटनेता मुन्ना तेली यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी ठेकेदारांनी जीएसटीची टक्केवारी निश्‍चित नाही याविषयीचे धोरण. संभावित कामाच्या ठिकाणच्या अडचणी दूर कण्यााबाबत माहिती देण्यात आली. यासह ११ ठिाकाणच्या पाणी टाकी, फिल्टर प्लॉंट, मुख्य पाईप लाईन रस्त्यांची खोदाई व नवीन रस्त्यांची कामे याबाबतच्या समस्यांचे निरसन करण्यात आले.

अमृत योजनेच्या निविदांची शेवटची तारिख ५ जुलै असल्याने ठेकेदारांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले. बैठकीनंतर तापी नदीवर जाऊन नदीवरील बंधारा जवळील रॉवाटर स्टेशन नदी पात्रात मंजूर होते. मात्र भविष्यातील संभावित अडचणी लक्षात घेता.

रॉ वाटर स्टेशन रस्त्याकडून करुन घेण्यात आले. याबाबत अधिकार्‍यांना तांत्रीक बाबी समजावून सांगण्यात आल्या त्यानंतर हा बदल करण्यात आला.पालिकेचे अमृत योजनेबाबतच्या अडचणी पार केल्या असून सप्टेबर महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.

तापी नदी पात्रातील बंधार्‍याच्या तांत्रिकबाबींची पूर्तता करण्यात आली असून लवकरच त्याची मंजुरी प्राप्त होऊन प्रतयक्षात कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचा विश्‍वास नगराध्यक्ष रमण भोळे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*