कोथळी जवळ ५० हजाराचा गांजा जप्त

0
मुक्ताईनगर |  वार्ताहर : तालुक्यातील कोथळी ङ्गाट्या जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र . ६ वर गुप्त माहीतीवरून सापळा रचत मुक्ताईनगर पोलिसांनी ५० हजाराच्या गांजासह ९८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी दोघांना अटक केल्याची घटना दि १४ चे पहाटे दीड च्या सुमारास घडली.

पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी दिलेल्या ङ्गिर्यादी नुसार,१४ चे पहाटे दीड वाजेच्या सुमारास कोथळी बायपास वरून होंडा कंपनीची युनिकोन मोटर सायकल क्रमांक (एम एच १९ सीबी ७१०९ ) या गाडीवरून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक सचिन इंगळे, उपनिरीक्षक वंदना सोनुने,तसेच कर्मचारी संतोष नागरे,किरण शिंपी,कल्पेश अमोदकर,सुनील बडगुजर व कांतीलाल केदारे यांनी सापळा रचत शेख मेहमूद शेख मेहबूब (वय ४९) तांबापुरा जळगाव तसेच शेख नईम शेख हमीद (वय ४२ ) रा बिस्ती मोहल्ला मस्जिद जवळ भुसावळ, या दोघांना शिताङ्गीने ताब्यात घेतले.

त्यांचे जवळुन ५० हजार रु किमतीचा ५ किलो गांजा तसेच ४० हजार किमतीची टीव्ही दुचाकी,७००० रु रोख,व १५०० रु चे दोन मोबाईल असा एकूण रु . ९८ हजार पाचशे चार इतका मुद्देमाल हस्तगत केला. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पी आय अशोक कडलग करत आहेत . मुक्ताईनगर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .

LEAVE A REPLY

*