Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी बी.पी.पाटील

Share
जळगाव दि. 12  : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी बी.पी.पाटील यांची निवड करण्यात आली असून सोमवारी त्यांनी प्रा.ए.बी.चौधरी यांच्या कडून या पदाची सुत्रे स्वीकारली.
सोमवार, दि.12 नोव्हेंबर रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी मुलाखती झाल्या. या मुलाखतीअंती बी.पी.पाटील यांची निवड करण्यात आली. श्री.पाटील हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मार्च 1992 पासून परीक्षा विभागात संगणक केंद्र प्रमुख या पदावर कार्यरत आहेत.
मध्यंतरी  सोलापूर विद्यापीठात त्यांनी चार वर्षे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून यशस्वी काम केले. त्यांना 26 वर्षाचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. शौक्षणिक व परीक्षा पध्दतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला. सोलापूर विद्यापीठात संचालक म्हणून काम करताना या अनुषंगाने त्यांनी परीक्षा विभागात नवीन प्रयोग राबवून वेगळी ओळख निर्माण केली.
  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ई-सुविधा केंद्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम करताना त्यांनी भरीव योगदान दिले. मुंबई विद्यापीठातील विविध परीक्षांच्या निकालांच्या निराकरणास मदत करण्यासाठी राजभवनाने त्यांची गतवर्षी नियुक्ती केली होती. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या चार विद्यापीठांमध्ये परीक्षा मूल्यमापन मंडळाचे सदस्य म्हणून देखील ते काम करीत आहेत.
राजेश अग्रवाल समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केले. इंडस् फाऊंडेशनच्या वतीने ई-गव्ह्रर्नन्ससाठी दिला जाणारा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सोलापूर विद्यापीठात संचालक म्हणून काम करताना कुलसचिव आणि वित्त व लेखाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांनी काही काळ सांभाळला.
सोमवारी सायंकाळी प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील आदींनी बी.पी.पाटील यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!