वादळामुळे केळीच्या बागांचे नुकसान

0
मुक्ताईनगर | वार्ताहर : मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या पावसासह वादळामुळे तालुक्यातील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून काही ठिकाणी तारा तुटून वृक्षही उन्मळून पडले आहेत.घरावरील छपरे, पत्रे, आल्याच्या घटनाही घडल्या.सुदैवाने जिवीत हानी टळली.

तालुक्यात सोमवारी सायंकाळी ७.३० ते रात्री ८.३० वाजेदरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे सुकळी, दुई, डोलार खेडा, कुर्‍हा, नायगाव, कर्की, अंतुर्ली,हरताळे, परिसरात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या.त्यामुळे शेतीपीकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसाळ्याच्या सुरूवातीलाच वादळाच्या तडाख्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आणले आहे.तर कोथळी बायपास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तसेच पुर्णाड ङ्गाटा टोलनाक्याजवळ आर.टी.ओ.चेक पोस्ट, बर्‍हाणपुर रोडवर, वृक्ष उन्मळून पडले.

हरताळे परिसरात रमेशभड, अशोक चौधरी, ईश्‍वर रहाणे, आनंदराव देशमुख, पंढरीनाथ मुलांडे, प्रल्हाद मुळे, शबानाबी, शे.रहेमान, शारदा मुळे, शे.रहेमान शे.उस्मान, ललीत कुमार जैन, पांडूरंग शेळके, संजय कार्ले आदी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर अनिल कोळी यांचे शेतातील सुमारे ४० वर्षापुर्वीचे आंब्याचे झाड उन्मळून पडले.

शांताराम निकम, कडू इंगळे, हिरा बोदडे, प्रमोद इंगळे, आदींच्या घरावरील पत्रे उडाली,काही शेतातील वीजतारा तुटल्या व विद्युत खांब वाकल्याच्या घटना घडल्या.मात्र अद्यापही शासनाच्या पदाधिकार्‍यांनी पंचनामे केले नाही.

LEAVE A REPLY

*