बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर ठोकला २३० कोटी रुपयांचा दावा

0
नवी दिल्ली :  बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल घोटाळ्यामुळे अनिल अंबानी अडचणीत आलेले असतानाच त्यांच्या रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या १४४ बँक खात्यात एकूण १९.३४ कोटी रुपयेच शिल्लक असल्याची माहितीसमोर आली आहे.

एका खटल्याप्रकरणी नवी दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यावरील याचिकेवर उत्तर देताना रिलायन्सने कोर्टात ही माहिती दिली आहे. अंबानींच्या या कंपनीवर ४६ हजार कोटींचं कर्ज आहे. त्यामुळे आरकॉमने गेल्यावर्षी त्यांचा वायरलेस बिझनेस बंद केला. सातत्याने तोटा होत असल्यामुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला होता.

त्यामुळे आरकॉमला याच वर्षी बँकरप्टसी प्रोसिडिंग्जमध्ये खेचण्यात येत होते. मात्र त्यातून ही कंपनी थोडक्यात बचावली. रिलायन्सने त्यांच्या ११९ बँक खात्यात केवळ १७.८६ कोटी रुपये जमा असल्याचं आणि आरटीएल कंपनीने त्यांच्या २५ बँक खात्यात एकूण १.४८ कोटी रुपये जमा असल्याचं कोर्टासमोर स्पष्ट केलं आहे.

दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर करताना बँक स्टेटमेंट्स देण्यासाठी कोर्टाकडून वेळ मागितला होता. आता याप्रकरणावर येत्या १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*