रक्तदाते ठरताय रुग्णांचे ‘जीवन आधार’

0
जळगाव | प्रतिनिधी :  रक्तदान, श्रेष्ठदान असं म्हणतात. कारण या दानामुळे माणसाचे जीव वाचतात. रक्तदान करणारी मंडळी माणुसकीच्या भूमिकेतून खूप मोठे कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या मोठ्या मनाची वाहवा कराची तेवढी थोडीच! जळगाव जिल्ह्यातही रक्तपेढींच्या जनजागृतींमूळे रक्तदात्यांच्या संख्येत वाढ झाली असून गरजु रुग्णांच्या जीवनाचे ते आधार झाले आहेत.

रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याकरीता वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनायझेशनने (जागतिक आरोग्य संस्था) २००४ पासुन  दि.१४ जून हा ‘रक्तदाता दिवस’ म्हणुन साजरा केला जातो. जळगाव जिल्ह्यातही रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षापासुन शहरातील मुख्य रक्तपेढ्यांमार्फेत जनजागृतीपर शिबीरे राबविण्यात येत आहेत.

याचे फलित म्हणुन पुर्वी रक्तदात्यांमध्ये असलेले गैरसमज दुर होत असून रक्तदान ही चळवळ होतांना दिसत आहे. गाव पातळीवर देखील रक्तदानाचे शिबीरे होतांना दिसत आहे. दहा वर्षापुर्वी ज्या गावात रक्तदान शिबीर घेतले जायचे त्या गावात १५ ते २० रक्त पिशव्या संकलीत व्हायच्या आता मात्र ही मर्यादा वाढत असल्याचे चित्र आहे.

रक्तदात्यांची संख्या जशी वाढत आहे. तशी गरज ही वाढत असल्याने नियमीत रक्तदान केले गेले पाहिजे असे तज्ञांकडून सांगण्यात आले.

रक्तदात्यांचा केला जातो गौरव

माधवराव गोळवलकर रक्तपेढीची सुरवात दि.१४ जून १९९८ रोजी झाली. रक्तदान स्वयंस्फुर्तीने चळवळ व्हावी यासाठी जनजागृतीपर शिबीरे घेतली जात आहेत. नियमीत रक्तदान करणार्‍यांसाठी ‘जीवन आधार’ व ‘जीवन संजीवक’ पुरस्कार दिला जातो.

रक्तपेढीत ८० हजार ३४८ रक्तादात्यांनी रक्तदान केले असून ८५ हजार १४१ गरजु रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे. असे माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे भानुदास येवलेकर यांनी सांगितले.

दहा वर्षात सव्वा लाख रक्तदात्यांनी केले रक्तदान

इंडियन रेडक्रॉस सोसायटीची १९८० मध्ये स्थापना झाली. गेल्या १० वर्षात रक्तपेढीमध्ये १ लाख २९ हजार ५२४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यावरुन १ लाख ६४ हजार ९२४ रक्तघटक तयार करण्यात आले.

रक्तदात्यांनी रक्तदान करुन अनेकांचे प्राण वाचविले असून रक्तदान हे नियमीत केले गेले पाहिजे. असे इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*