Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

अहमदाबादचे आता ‘कर्णावती’ होणार नामकरण

Share
अहमदाबाद : गेले अनेक वर्षापासून गुजरात मधील अहमदाबाद शहराचे नाव आता ‘कर्णावती’ असे करण्यात येणार आहे. तशी तयारी गुजरात सरकारने सुरू केली आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगीतले.

अहमदाबादचे नामकरण करण्याची शासकीय पातळीवरची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

राजभावना नव्हे लोकभावना

अहमादाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. आम्हाला लोकांकडून जर या नावासाठी पाठिंबा मिळाला तर आम्ही कायदेशीर अडथळे पार करून अहमदाबादचे नाव नक्की बदलू असेही नितीन पटेल यांनी म्हटलं आहे. अहमदाबादचे ११ व्या शतकातले नाव अशावल असे होते.

अनिल्वराचा चालुक्य राजा कर्ण याने अशावलच्या भिल्ल राजाविरोधात लढाई जिंकली ज्यानंतर त्याने अशावलचे नाव बदलून कर्णावती असे ठेवले. त्याच नावाची आठवण म्हणून अहमदाबादचे नावही कर्णावती असे ठेवणार असल्याचे नितीन पटेल यांनी म्हटले आहे.

कर्णावतीचे नाव अहमद शाह या सुलतानाने बदलून अहमदाबाद असे ठेवले होते. मात्र आम्ही हे नाव बदलण्याचा विचार करतो आहोत असेही पटेल यांनी म्हटले आहे.

नितीन पटेल यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते मनिष दोशी यांनी टीका केली आहे. मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपाकडून शहरांची नावं बदलली जात आहेत.

अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही असेही दोशी यांनी म्हटले आहे. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होते आहे अशीही टीका दोशी यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!