Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

मराठी नाट्य परिषदेतर्फे नटराज पूजन

Share
जळगाव ।  प्रतिनिधी :  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे जुने बालगंधर्व खुले नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिन नटराज पूजनाने साजरा करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी काशिनाथ सोनार यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. यानंतर त्यांनी एकच प्याला या नाटकातील काही संवाद सादर केले. अनिल मोरे यांनी एक नांदी सादर करुन रंगदेवतेला नमन केले.

यानंतर पत्रकार विजय पाठक यांनी आपले अनुभव व नाट्य चळवळीचा इतिहास कथन केला. रमेश भोळे व अरविंद देशपांडे यांनी अ.भा. मराठी नाट्य परिषद जळगाव शाखेच्या सुकाणू समितीची भूमिका स्पष्ट केली. व शहरातील नाट्य चळवळ व नाट्य कलावंताचे संवर्धन याच बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात झाले आहे हि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन या रंगमंदिरातही नटराज पूजन झालेच पाहिजे या भूमिकेतून मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला असल्याचे सांगितले.

याप्रसंगी वैशाली पाटील, रमेश भोळे, अरुण सानप, राजेंद्र देशमुख, ओम प्रकाश शर्मा, विनोद ढगे, विजय पाठक, नितीन देशमुख, सुभाष मराठे, पियुष रावल, प्रसाद चिकेरुर, अनिल मोरे, वैभव मावळे, गणेश सोनार, आशिष कुळकर्णी, विशाल जाधव, दीपक पाटील, मोरेश्वर सोनार, चिंतामण पाटील, अरविंद देशपांडे, मोहन तायडे, प्रवीण पांडे, योगेश लांबोळे, ढोलनदास चव्हाण, होनाजी चव्हाण, संतोष मराठे, नरेंद्र भंगाळे यांची उपस्थिती होती. सुभाष मराठे यांनी प्रास्तविक, अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!