जलयुक्त शिवार अभियानाचे काम देशाला मार्गदर्शक- ना. सदाभाऊ खोत : जळगावला महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात

0

जळगाव:   ध्वजारोहण, मानवंदना आणि त्यानंतर पार पडलेल्या शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७ व्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य हे प्रगतीचे अनेक नवे आयाम गाठतअसून राज्य शासनाने राबवलेले जलयुक्त शिवार अभियान हे देशाला मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचेकृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले.

जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, आ. सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल भामरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक , राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वा. ना. खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले.

त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड, वाहतुक पोलीस, महिला पोलीस पथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन पथक, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. यावेळी ना. खोत यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना गौरविण्यात आले.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान

यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देऊन ना. खोत म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानाची चांगली अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होत आहे.

पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर वाढले आहे.शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी शेतीचे अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ हे अभियान शासनाने सुरु केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तूर खरेदीसाठी राज्य शासनाने ३ हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असून आतापर्यंत ५० लाख क्विंटल तूर खरेदी शासनाने केली आहे.

खऱ्या अर्थाने सामान्य माणूस, कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे हे शासन आहे. शासनाच्या विविध उपक्रमांना जनतेची साथ लाभत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर ना. खोत यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील आणि प्रा. डॉ. गयाज उस्मानी यांनी केले.

सन्मानार्थिंची नावे याप्रमाणे

जिल्हा युवा पुरस्कार-

युवक- डॉ. श्रेयस घनश्याम महाजन,

युवती- सौ. दिपमाला राजेंद्र वंजारी,

संस्था- केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव अध्यक्ष भरत अमळकर

यावेळी सन 2015-16 साठी राज्यस्तर पुरस्कार भरारी बहुउद्देशिय संस्था , अध्यक्ष दीपक परदेशी व जिल्हा युवा पुरस्कार यशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, चोपडा अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनाही गौरविण्यात आले.

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-

पोलीस अधिकारी/कर्मचारी :- श्री. इश्वर जगन्नाथ सोनवणे, विजय श्रीकृष्ण बोत्रे, रविंद्र ब. सपकाळे, शेख मकसुद बशिर, मुजफरअली सैय्यद, राजेंद्र हं. पवार, तुकाराम निंबाळकर, सुनिल बा. पाटील, जयंत भा. चौधरी, दिलीप विठोबा पाटील, अरुण वामनाव पाटील, जयवंत सं. पाटील, दिनेशसिंग लोटू पाटील, प्रदीप रा. चिरमाडे, सुनिल शा. पाटील, नरेंद्र लो. पाटील, प्रदिप व. पाटील, जमील अ. हमीद खान,

जिल्हा क्रिडा पुरस्कार –

गुणवंत खेळाडू- सिध्दांत ईश्वर पाटील (तायक्वोंदो),  गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- अनिल हरिचंद्र माकडे( आट्यापाट्या), गुणवंत क्रीडा संघटक- शेख फारुक अब्दुला( फुटबॉल, हॉकी)

स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सन्मानित करण्यात आलेल्या ग्रामपंचायती-

पिंगळवाडे , ता.अमळनेर,  पिंपळगाव बु. ता. भडगाव, टहाकळी, ता. भुसावळ, हरणखेडा, ता. बोदवड, चितेगाव, ता. चाळीसगाव, वढोदा, ता. चोपडा, धानोरा, ता. धरणगाव, गालापूर, ता. एरंडोल, फुफणी ता.जि. जळगाव, सामरोद, ता. जामनेर, सालबर्डी, ता. मुक्ताईनगर,सारोळा बु. ता. पाचोरा,बहादरपुर, ता. पारोळा,दसनुर, ता. रावेर, न्हावी प्रया, ता. यावल

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहण

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातही महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इमारतीतील सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*