धरणगाव तालुक्यात दहावीत हर्ष बोरसे प्रथम

0
धरणगाव | प्रतिनिधी :  नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी परीक्षेच्या निकालात येथील पी.आर.हायस्कूलचा हर्ष उमाकांत बोरसे हा ९९.४० टक्के गुण मिळवून तालूक्यात प्रथम आला.

पी.आर.विद्यालयात ९७.४० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु.मयुरी नरेंद्र चौधरी मुलींमध्ये तालुक्यात प्रथम आली आहे .तृतीय क्रमांक वैभव संजय बिचवे (९६.६०) तर मागासवर्गीय विद्यार्थीनीत कु.मोक्षदा राजेंद्र पवार (९४.४०) हीचा प्रथम क्रमांक आला. विद्यालयाचा निकाल ९३.% लागला.

एकूण १२० विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले. हर्ष बोरसेचा सत्कार संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हर्षने पुढे आयआयटीकडे जाणार असल्याचे नमूद केले आहे.

म.फुले हायस्कूलचा निकाल ९४.७३ टक्के

येथील महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.शाळेतुन प्रथम येणारे विद्यार्थी असे, प्रथम – कु. डिंपल लक्ष्मण माळी(९१ %)द्वितीय-कु.कविता सुभाष सोनवणे(८९.८०%) तृतीय -कु. चेतना अशोक माळी (८९.६० %)बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगांवचे संचालक मंडळ,मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदयांनी अभिनंदन करून पुढील शैेक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कुडे विद्यालयाचा १०० टक्के निकाल

येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक विद्यालय व कुडे माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.  चेतन राजेंद्र पाटील हा ९९ टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला आहे.

ज्योत्स्ना ज्ञानेश्‍वर माळी ही विद्यार्थिनी ९६.४ टक्के गुण प्राप्त करून व्दितीय आली आहे. आदिती जयंत कुळकर्णी ९६ टक्के गुण प्राप्त करून तिसरी आली आहे. शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

आदर्श विद्यालयाचा १०० टक्के निकाल

मार्च-२०१७ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात आदर्श विद्यालय धरणगावचा निकाल १०० टक्के लागला

मयुरी जनराज बेंद्रे ही ४६२ गुण मिळवून ९२.४० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला असून सिमरन रामचंद्र पवार हिने ४५३ गुण मिळवून ९०.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन सी.के.पाटील व उपाध्यक्ष किरण पाटील यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*