फत्तेपूर न्यु इग्लीश स्कूलचा ८८ टक्के निकाल

0
फत्तेपूर,ता.जामनेर |  वार्ताहर  :  येथील न्यु इंग्लीश स्कूल शाळेचा इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल आज जाहिर करण्यात आला असून शाळेचा ८८.८० टक्के लागला आहे.

रोशन कैलाश चव्हाण याने ९२.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर कु.प्रतिक्षा विजय देशमुख हिने ९०.४० टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. कु.अश्‍विनी संतोष पाटील हिने ९०.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

एस.एस.सी परिक्षेत ४०२ विद्यार्थी बसलेले होते.त्यापैकी ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.५४ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम श्रेणीत ११६ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत १४५ विद्यार्थी तर ४२ विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.महाजन,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आदिंनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

*