चाळीसगाव तालुक्याचा दहावीचा ८८ टक्के निकाल : तीन विद्यार्थांना १०० टक्के गुण, पाच शाळांचा १०० टक्के निकाल

0

चाळीसगाव, |  प्रतिनिधी : तालुक्यात उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत (दहावी)  तालुक्याचा ८८.०८ टक्के निकाल लागला. यात पाच शाळांची निकाल १०० टक्के लागला आहे.

शहारतील आनंदीबाई बंकट मुलींच्या हायस्कुलमधील भाग्यश्री सुनील कोतकर व प्रज्ञा अनिल येवले व डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे मा.विद्यालयांचा विद्यार्थी चेतन मौरे यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. येथील तात्यासाहेब सामंत (गुरूकुल) विद्यालयाचा निकाल सलग १५ व्या वर्षी १०० टक्के लागला. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण यंदाही मुलांपेक्षा अधिक आहे.

मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यातील १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होतो. परंतू यंदा फक्त पाच शाळांचा निकाल १०० टक्के लागला. त्यातील ४ शाळा शहरातल्या आहेत. शहरातील गुड शेफर्ड ऍकेडमी इंग्लिश स्कूल, तात्यासाहेब सामंत विद्यालय (गुरूकुल), इंदिरागांधी सिंधी हायस्कुल तसेच ग्रेस ऍकेडमी इंग्लिश स्कुल, हिरापूर रोड तसेच मेहुणबारे येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा या शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

आ.बं.गर्ल्सचा ९० टक्के निकाल

चाळीसगाव ये्थील आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कुलचा निकाल ९०.१४ टक्के लागला. २५२ पैकी २२८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ३१ विद्यार्थिनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. भाग्यश्री सुनील कोतकर (१००), प्रज्ञा अनिल येवले (१००), प्रणाली नितिनसिंग परदेशी (९६.२०), चेतना अनिल चौधरी (९५.६), सृष्टी रावसाहेब पाटील (९५.२०), मानसी जितेंद्र जाधव (९५.००), राखी विलास कोतकर (९४.६०), रश्मी मनोज मोरे (९४.४०), प्रणाली महेश मगर (९४.२०), मेघा मोहन साठे ९३.८०, प्रज्ञा किशोर भोकरे (९३.६०), श्रृती अविनाश अमृतकार (९३.२०), वैष्णवी एकनाथ सोमवंशी (९३.००), धनश्री राजेंद्र येवले (९३.००), हर्षिता गोविंद जाधव (९२.४०), पूजा दिपक शिरसाठ(९२.४०), मयुरी दिपक जगताप (९२.४०), तेजस्विनी जयवंत कोतकर (९२.२०), दिपाली संभाजी पाटील (९२.००), साक्षी प्रवीण खैरनार (९१.६०), वैदीही संभाजी गोलाईत (९१.४०), स्वामिनी सुरेंद्र शितोेळे (९०.८०), निकीता संजय पाटील (९०.६०), उन्नती ज्ञानेश्वर येवले (९०.६०), संस्कृती रवींद्र लोंढे(९०.६०), पूर्वा उदयकुमार पगारे(९०.४०), पल्लवी संतोष वाघ (९०.४०), नेहा भरत पाटील(९०.४०), पूजा विकास बाविस्कर(९०.२०), अनुष्का दिनेश पाटील (९०.००), निकीता परमेश्वर पाटील( ९०.००).

पूर्णपात्रे मा.विद्यालयाचा ९८.७३ टक्के निकाल

डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचा ९८.७६ टक्के निकाल लागला आहे. यात चेतन प्रमोद मोरे याला १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर शाळेतील १३ विद्यार्थीना ९५ टक्के गुणप्राप्त झाले आहेत.

तर ६१ टक्के विद्यार्थांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थांचै मुख्याध्यापक अविनाश वाबळे व संस्थेच्या अध्यक्षा डॉ.हेमांगीताई पूर्णपात्रे यांनी अभिनंदन केले आहे.

जयहिंद विद्यालयाचा ८९ टक्के निकाल

शहरातील जयहिंद माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शालांत परिक्षा एस.एस.सी.चा निकाल ८९.०२ टक्के लागला आहे. परिक्षेस बसलेल्या ८२ विद्यार्थीं पैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यात प्रथम क्रमांके सोनाली किशोर बेलदार (८६.२० टक्के), द्वितिय क्रमांक समिक्षा विजय राठोड(८५.४० टक्के) व तृतीय क्रमांक सोनाली मुकुंद पवार(८४.६० टक्के) प्रथम श्रेणीत उर्त्तीर्ण झाल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव अशोक हरी खलाणे यांनी अभिनंदन केले आहे.

गुड शेपर्ड अकॅडमीचा १०० टक्के निकाल

एस.एस.सी परिक्षेत शहरातील गुड शेपर्ड अकॅडमीचा १०० टक्के निकाल लागल आहे. अकॅडमीच्या हे जुही हरेश राजानी (९३.३० टक्के), काजोल राजीव गुप्ता(९२.४० टक्के), जिनल राजेश जैन(९२ टक्के), सुप्रिया प्रमोद वर्मा(९१.६० टक्के), कपील मनोज अहिरराव (९१ टक्के), निकिता ईश्‍वर काकडे(९०.४० टक्के), पुनकम दादाभाऊ गुंजाळ(९०.२० टक्के) हे प्रथम श्रेणीत उर्त्तीर्ण झाले आहेत.

मेहुणबारे आश्रमशाळेचा १०० टक्के निकाल

तालुक्यातील मेहुणबारे आश्रमशाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. प्रथक क्रमांक कु.दुरबाई कावस्था पावरा(८७.२० टक्के),द्वितिय क्रमांक कु.अनिता बिंद्या पावरा(८५.६० टक्के), तृतीय क्रमांक कु.शितल रायसिंग तडवी (८५.२० टक्के) ह्यानी पटकावला आहे.

LEAVE A REPLY

*