तिळ्या बहिणींखी अनोखी कहाणी !

0
लंडन | वृत्तसंस्था : सयामी जुळ्यांची अनेक उदाहरणे जगासमोर आहेत. काही सुदैवी सयामी जुळी वेगळे करण्यात डॉक्टरांना यश आले, काहींचा या प्रयत्नात मृत्यूही झाला. मात्र, एखाद्या महिलेस तिळे झाले आहे आणि त्यापैकी दोन सयामी जुळे आहेत असे उदाहरण क्वचित पाहायला मिळते.

मॅकी, मॅकेंजी आणि मॅडेलियन या तिळ्या बहिणी अशाच आहेत. या तिघींच्या जन्मानंतर त्यांच्या जन्मदात्या आईने त्यांचा त्याग केला होता. एका कुटुंबाने या तिघींना दत्तक घेतले. तसेच सयामी जुळ्या बहिणींवर शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळेही केले.

या मुलींना जन्म देणारे आई-बाप त्यांना सांभाळू शकत नव्हते म्हणून त्यांना सोडून गेले. त्यामुळे या तिघींचा ताबा अमेरिकेतील आयोवा येथे राहणार्‍या गॅरिसन कुटुंबाला देण्यात आला. जेङ्ग आणि डार्ला गॅरिसन हे तीन मुलांचे आई-वडील होते.

मात्र, त्यांनी या तिघींना आनंदाने स्वीकारले. शिवाय, सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया करवून त्यांना वेगळेही केले. सप्टेंबर २०१३ मध्ये नऊ महिन्यांच्या या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. चोवीस तासांच्या या शस्त्रक्रियेनंतर त्यांना वेगळे करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर या दोघींच्या देहाला एक-एकच पाय राहिला. आता त्यांना दुसरा नकली पाय बसवण्यात आला आहे. या तिघीही आता गॅरिसन कुटुंबासमवेत खूश आहेत.

LEAVE A REPLY

*