वायरलेस स्मार्टफोन चार्जर

0
कोणत्याही स्मार्टफोनला चार्जर करण्यासाठी वायरची आवश्यकता असतेच. मात्र मोफी या कंपनीने वायरलेस पध्दतीने स्मार्टफोन चार्जींग करणारे चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे चार्जर बाजारात सादर केले आहे.

चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे चार्जरमध्ये ३ हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी चार्ज केल्यानंतर चुंबकीय लहरींच्या मदतीने उर्जेचे वहन करुन याला अटॅच केलेल्या स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करता येते.

सॅमसंग गॅलेक्सी एस ७, एस ६ एज, एस ८ आणि एस८ प्लस तसेच ऍपल आयफोन ६/६प्लस, आयफोन ७/७ प्लस आदी मॉडेल्सच्या बॅटरीला याच्या मदतीने चार्ज करता येते.

आगामी काळात काही स्मार्टफोनचा यात समावेश करण्यात येईल असे मानले जात आहे. अजून हे तंत्रज्ञान तसे बाल्यावस्थेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर मोफी कंपनीचे चार्ज फार्स पॉवरस्टेशन मिनी हे चार्जर अतिशय अनोखे असेच आहे.

तसेच स्मार्टफोनची बॅटरी नेमकी किती प्रमाणात चार्ज झाली? हे समजण्यासाठी यात चार एलईडींनी युक्त असणारे इंडिकेटर प्रदान करण्यात आले आहे. चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे मॉडेल एखाद्या स्मार्टफोनच्या बॅटरीसारखे असून ते कोणत्याही हँडसेटच्या मागील बाजूस सहजपणे अटॅच करता येते.

यानंतर कोणत्याही वायरची मदत घेतल्याविना संबंधीत हँडसेटची बॅटरी वायरलेस पध्दतीने चार्ज होण्यास प्रारंभ होतो. यासोबत प्रायॉरिटी प्लस या मायक्रो-युएसबीची सुविधादेखील देण्यात आली आहे. याच्या मदतीने संबंधीत उपकरणासह स्मार्टफोनलाही चार्ज करता येते.

LEAVE A REPLY

*