यशवंतपूर एक्सप्रेसमधून 16 हजारांचे मोबाईल लंपास

0
भुसावळ । गाडी क्र. 16501 अहमदाबाद यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेसमधून 500 रुपयांच्या रोकडसह 16 हजार 300 रुपयांचा ऐवज लांबविल्या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपाराम पुनाराम (रा. 752,कुमारो कावास केशवना, जालोर, राजस्थान) हे दि. 7 मार्च रोजी गाडी क्र.16501 अहमदाबाद यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेसच्या डबा क्र. एस 8 मधून प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील लेडीज पर्स लांबविली.

या पर्समध्ये 500 रुपये रोख तर 15 हजार 800 रुपयांचे तीन मोबाईल असा ऐवज लांबविला. याबाबत गोपाराम पुनाराम यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल होवून दि. 20 रोजी भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. असून गु.र.नं. 563/18, भा.दं.वि. 379 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक भरत पवार करीत आहे.

LEAVE A REPLY

*