जि. प.समाजकल्याण समितीची सभा : मागील सभेचे इतिवृत्त न मिळाल्याने सदस्यांची नाराजी

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभेत अजेंडयासोबत मागील सभेचे इतिवृत्त न मिळाल्याने सत्ताधारी सदस्य जयपाल बोदडे यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी समाजकल्याण विभागाच्या डॉ. राठोड यांनी यापुढे सभेला इतिवृत्त पाठविण्यात येईल असे सांगितले. यासभेत मागासवर्गीय व दिव्यांगाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांसाठी ४ कोटी ४५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, भानुदास गुरचळ, सोनू पवार, वनिता गवळे, सुनील महाजन, किर्ती चित्ते आदी उपस्थित होते.

सुरवातील जयपाल बोदडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त न मिळाल्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित करत गेल्या सभेत अनुपस्थित असलेले सदस्य गुरचळ यांचे नाव अनुमोदक म्हणून कसे? यावर आक्षेप घेतला.

सभेमध्ये २० टक्के सेसफंडातून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांच्या ३ कोटी ११ लाख २९ हजार रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

तसेच तीन टक्ऐके दिव्यांगाच्या कल्याणासाठीच्या योजनेकरीता १ कोटी ३४ लाख रूपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, हे विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचे निश्‍चित करण्यात आले.

LEAVE A REPLY

*