मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी तिघांना अटक

0
जळगाव । भुसावळ येथील स्टेशनरोड परिसरात मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी एका युवकाचा 22 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हाचा समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांनी इतर गुन्हयाची देखील कबुली दिली आहे. भुसावळ बाजारपेठ, शहर व तालुका पोलिसात मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांना मिळालेल्या माहितीवरून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पीएसआय सचिन खामगळ, पोहेकॉ. सुपडू पाटील, पोहेकॉ. युनुस खान, स्थागुशातील पोहेकॉ. विजय पाटील, रविंद्र पाटील, शरीफ काझी, नरेंद्र वारुळे, विकास वाघ, इद्रीस पठाण, भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोना. सुनिल सैदांणे, कृष्णा देशमुख, शेखर गाडगीळ यांच्या पथकाने राहुल नामदेव कोळी वय 19 रा. मरीमाता मंदिर रोड, जुना सातारा, राज रविंद्र भालेराव रा. खकनार, मध्यप्रदेश ह.मु. गणेश कॉलनी भुसावळ, लवेश रामलाल परदेशी या तिघांना ताब्यात घेतले आहे.

यातील राहुल नामदेव कोळी यांने भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन विधीसंघर्ष बालकाच्या मदतीने मोबाईल लांबविले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दरम्यान या संशयितांकडू एमएच 19 डीबी 1052 क्रमांकाची मोटारसायकल मिळून आली असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*