श्रीमंत नवरा शोधण्याचे ट्रेनिंग !

0
बीजिंग | वृत्तसंस्था  :  एखाद्या तरुणीच्या भावी पतीकडून काय काय अपेक्षा असू शकतात? देखणा (हे आधी पाहिजे), ‘सरकारी’ नोकरदार किंवा डॉक्टर-इंजिनिअर (परदेशात नोकरी करणारा असेल तर प्राधान्य!), सुशिक्षित कुटुंबातील वगैरे वगैरे अपेक्षा असणार्‍या मुली अनेक आहेत.

अर्थात ‘श्रीमंत नवरा’ असणे ही अनेकींची सुप्त इच्छा असू शकते. काही मुली लग्नासाठी मुद्दाम श्रीमंत मुलगा बघतात तर काही मुली मुलगा श्रीमंत बघूनच पटवतात म्हणे! अर्थात प्रत्येकीला हे जमत नाही.

यावर तोडगा म्हणून चीनमध्ये चक्क श्रीमंत नवरा कसा पटवावा याची शिकवणी आता सुरू झाली आहे. एका गर्भश्रीमंताला चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडू या शहरातील सू ङ्गेई (४२) हिने पटविले आणि त्याच्याशी विवाह केला.

आता ती शिकवणी वर्गात विवाहोत्सुक श्रीमंत मुलांना कसे शोधावे, त्यांची ओळख काढून त्यांच्या निकटवतीर्यांमध्ये कसे सहभागी व्हावे आणि नंतर विवाहापर्यंत कशी मजल मारावी, याची शिकवणी सू ङ्गेई देते.

ती ही शिकवणी देण्यासाठी १० हजार युआन म्हणजे सुमारे ९० हजार रुपये एवढी ङ्गी आकारतात.
येथील या अभ्यासक्रमात श्रीमंत पती कसा पटवावा, याचेच शिक्षण प्रामुख्याने दिले जाते. सू ङ्गेई हिने वयाच्या ३७ वर्षी एका कोट्यधीशाशी विवाह केला.

ग्वांगडॉंग प्रांतातील शेन्झेन शहरात आता ती राहते आणि तिथेच त्यांनी सात वर्षांपूर्वी वर्ग सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

*