ब्रेललिपीसाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजनांची अपेक्षा : अंध-अपंगांच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन

0
जळगाव |  प्रतिनिधी :  अंध बांधवासाठी वापरली जाणारी ब्रेललिपी मागे पडत असल्याने यावर शासनाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचा ठराव अंध-अपंगांच्या राज्यस्तरीय सहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी पारीत करण्यात आला.

मू.जे महाविद्यालय येथे सलग दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अंध-अंपगांच्या राज्यस्तरीय दुसर्‍या समाजोत्थान साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला.

यावेळी ११ सदस्यीय अंध अपंगाची सुकाणू समिती राज्यस्तरावर नेमणे, साहित्य संमेलनासाठी अनुदानाची मागणी करणे, बे्रललिपीसाठी सरकारने प्रभावी योजना करणे, नवीन नाणी व चलनी नोटा अंध व्यक्तींना सहज ओळखता याव्यात अशी तरतुद करणे हे तीन ठराव पारीत करण्यात आले.

संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात कवी संमेलन घेण्यात आले. त्यानंतरच्या दुसर्‍या सत्रात बे्रल लिपी सद्यस्थितीत मागे पडते, का? या विषयावर प्रभा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला.

यात अशोक पाटील, पदमा पटेल, काशिनाथ महाजन, राशीधरण कृष्णन, राजेंद्र चव्हाण यांनी सहभाग नोंदविला. सर्वशिक्षा अभियानात विशेष शिक्षक म्हणून अंध व्यक्तींना न घेतले जाणे, अंध शाळेतही अंध शिक्षकांची संधी डोळसांना दिली जाणे, परिक्षा पध्दतीत लेखीपेक्षा तोंडीवर भर देणारे शिक्षक तसेच पूर्वीसारखे ब्रेलसंक्षेप ट्रेनिंग होत नसल्याने श्रम, कागद व वेळ वाया जात असल्याने बे्रललिपी मागे पडत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

समारोपाप्रसंगी आनंदा कोल्हे यांनी अंध बांधवासाठी कायद्याचे ज्ञान देणारी कार्यशाळा राबवू असे घोषित केले. समारोपाप्रसंगी काशिनाथ महाजन, मू.जे महाविद्यालयाचे उपप्राचार्य नंदकुमार भांरबे, रेवांनद मेश्राम यांनी मनोगत व्यक्त केले.

अंध-अपंगानी सादर केल्या कविता

चैतन्यचक्षु अपुले जागे सदैव ठेवू
अंधत्व भेदुनी हे जगणे सतेज ठेवू

ही कविता काशिनाथ महाजन यांनी सादर केली.

अंध- अपंगाच्या राज्यस्तरीय समाजोत्थान सहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी अंध अपंगांच्या कलागुणांना वाव मिळावा यादृष्टिने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कविसंमेलनात अंध अपंग बांधवांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर कवी रेवांनद मेश्राम, रेखा महाजन, शारदा गायकवाड, सुवर्णा महाजन, दुर्गा गवई, रमा पाटील, शशीधरण कृष्णन, लीला लाकडे, राजेंद्र चव्हाण, प्रभा मेश्राम यांनी कविता व विविध कलागुणंाचे सादरीकरण केले.

त्यानंतर नागपूर येथील राधा बोरडे यांची मुलाखत शारदा गायकवाड यांनी घेतली. यावेळी राधा बोरडे यांनी आपल्या जीवनातील चढ-उतार सांगून उपस्थितांना प्रेरीत केले.

LEAVE A REPLY

*