ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रभावी माध्यम – डीआयजी वारके

0

जळगाव |  प्रतिनिधी :  आयुष्यात यशाच्या मार्गावर चालतांना अनेक अडचणी येतात. आपण धोके स्विकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. लहानपणीच ध्येय निश्‍चित करून त्यादृष्टिने तयारी केल्यास यशापर्यंत पोहचणे शक्य होईल. ध्येयापर्यंत पोहचण्याठी स्पर्धा परिक्षा हे माध्यम आहे असल्याचे प्रतिपादन मुंबई एटीसीचे डीआयजी सुहास वारके यांनी केले.

जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. (ग.स.सोसायटी) संचलित ग.स.प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. पी.पाटील होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.आबा पाटील, ग.स.सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील, उदय पाटील, देवेंद्र पाटील, रागिनी चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेही पुढे बोलतांना वारके म्हणाले की, आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

पुर्वी मार्गदर्शन करणार्‍या संस्था नव्हत्या, शिक्षकांना देखील युपीएससी परिक्षा काय हे माहित नव्हते. पण आज ही परिस्थिती नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे, हे शालेय जीवनापासूनच निश्‍चित करायला हवे. विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड नाही, केवळ त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

डॉक्टर, इंजिनिअर होण्यापलिकडे लोकांसाठी काही करता येणारे क्षेत्र सिव्हील सर्व्हिसेसचे आहे. ध्येय निश्‍चित करताना ते मोठे असायला हवे. आपण जे प्रयत्न करतो, त्यांना शंभर टक्के यश मिळेलच असे नाही. याकरीता परिक्षांचे टेक्निक आत्मसात करून, याची तयारी करताना प्रश्‍नांचा सर्व बाजूंनी विचार व्हायला हवा.

शिवाय, धोका पत्करण्याची तयारी असली, तर ध्येय गाठण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. पण विचारांच्या चाकोरीत राहिलात तर बाहेर पडू शकणार नाही. मात्र, तुम्हाला यश प्राप्त करायचे असेल, तर आत्मविश्‍वास आणि क्षमता यांची सांगड घालून धोके पत्करण्याचे आवाहन केले.

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची संागड घाला – कुलगुरु

जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्‍वास ध्येय आणि विद्यार्थ्यांनी ध्येय ठरविताना नेहमी मोठेच ठरवायला हवे. ते शक्य होईल की नाही; याचा विचार करत बसू नये. अपयश हे येतच राहणार.

त्याला घाबरायचे नाही, अपयश आलेच तर त्याला दुसरा पर्याय निर्माण करून ठेवायला हवा. जेणेकरून स्पर्धा परिक्षेत यश मिळाले नाही, तर दुसर्‍या मार्गाने आपण जावून यशस्वी होवू शकतो. असे कुलगूरू डॉ. पी. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

LEAVE A REPLY

*