Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश

एफआयटीआयच्या अध्यक्षपदाचा अनुपम खेर यांनी दिला राजीनामा

Share
पुणे : भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदाला लागलेले ग्रहण संपता संपेना. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अनुपम खेर यांनी पदाचा राजानामा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन शोच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने एफटीआयआयचं अध्यक्षपदाचं कामकाज हाताळण्यासाठी वेळेचं नियोजन करणं कठीण होत असल्याचं कारण खेर यांनी दिलं आहे.

मुंबईत मंगळवारी एफटीआयआयच्या सोसायटीची बैठक झाली होती. अनुपम खेर देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी खेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दीड वर्षापासून रखडलेली एफटीआयआय सोसायटीची बैठक काल मंगळवारी पार पडली.

या बैठकीला अनुपम खेर यांच्यासह नियामक मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष बी. पी. सिंग, अभिनेत्री दिव्या दत्ता, प्रा. अर्चना राकेश सिंग, संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदींची उपस्थिती होती. या बैठकीत धोरणात्मक विषयांवर चर्चा झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही चर्चा करण्यात आली.

नियामक मंडळ आणि विद्या परिषद स्थापण्यात आली असून अभिनेते सतीश कौशिक यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!